shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाप माझा वारकरी..!

बाप माझा वारकरी
बाप माझा वारकरी
करी पंढरीची वारी
उभा राही विठ्ठलाच्या दारी
जवा जाई तवा सांगे
मातीच्या लेकराच गाऱ्हाण
 नाही पाऊस नाही पाणी
किती सोसावी ही तहान

अरे विठ्ठला विठ्ठला 
कुठे कसा रे दडला
तुझ्यासाठी जीव माझा
किती किती रे रडला

राबतात रोज हात
नेते करतात घात
मिरचीला मारून टोचा
खातो भाकरीचा घास


पीक रानात झुलतं
तसं सपान फुलतं
कधी जळून या जातं
तसं काळीज जळतं

कवी- बाबासाहेब पवार
वडाळा महादेव
ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर
मो.बा.8796742243
close