shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हा परिषद येथे म्हस्के यांचे अमरण उपोषण सुरु ...


प्रशासन दखल घेणार का ?

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १० /  अहमदनगर तालुक्यातील दहिगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के यांनी आज  दि . १० ऑक्टोबर पासून अहमदनगर जिल्हा परिषद येथे अमरण उपोषण सुरू केले आहे . म्हस्के यांनी या आधीही समाजाच्या हितासाठी कल्याणासाठी वेळोवेळी उपोषण केले आहे . कित्येकदा व्यक्तींना समाजहितासाठी उपोषण करावे लागते तेव्हाच प्रशासनाला जाग येते ही एक शोकांतिका आहे .

म्हस्के यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत .
दहिगाव ग्रामपंचायत येथे एकच ग्रामसेवक गेले ११ ते १२ वर्ष याच ठिकाणी कार्यरत आहेत , दहिगाव जिल्हा परिषद शाळा धोकादायक इमारतीची जबाबदारी निश्चित करणे, शाळा गुणवत्ता राखणे , तक्रार अर्ज १५/६/२०२२ कार्यवाही, कारवाई अहवाल अद्याप मिळालेला नाही , गटविकास अधिकारी पंचायत नगर दि. २७/०६/२०१९ अर्ज कारवाई, कार्यवाही अहवाल अद्याप नाही ,घरकुल योजना, शासकीय विविध योजना, सुडबुद्धीने लाभार्थीस लाभ नाकारणे, मनमानी कारभार, राजकीय व्यक्तींच्या आदेश नुसार काम करणे, मुख्यालयात हजार नसणे नागरिकांना  अपमानास्पद भाषेचा उपयोग करणे वागणूक देणे , तरी हा पारदर्शक कारभार व्हावा तसेच नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायत CCTV कॅमेर, थम मशीन हजेरीपत्रक बसवणे बंधनकारक व्हावे.

 फक्त दहिगाव ग्रामपंचायत विषय न सोडता नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायत कारभार सुधारण्यासाठी प्रशासनाला सदबुद्धी लाभो ही साईबाबा चरणी प्रार्थना करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवहरी म्हस्के यांनी सांगितले .

सदर उपोषणास ज्ञानदेव सांगळे , विश्वनाथ शिंदे
नाना गायकवाड (श्रीराम ट्रस्टचे संस्थापक ) , शरीफ सय्यद , सोहेल शेख ,आजीनाथ म्हस्के , रफीक शेख , परशुराम जगधने , जनाधार संघटनेचे प्रकाश पोटे ,  सबिल सय्यद , सद्दाम शेख ,जन आरोग्य फाउंडेशनचे योगीराज धामणे ,
सचिन गांधी ,निरज चांगटे , विनायक गुरसाळी , संजय वायकर आदि पत्रकार व सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे .
close