shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजलगांव धरणाचे तीन दरवाजे उघडले १३ क्युसेसने सिंदफणा नदी पात्रात विसर्ग ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस ; अतिवृष्टीमुळे सोयाबीन , कापसाचे मोठे नुकसान!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                 

माजलगांव धरण आज पहाटे १०० टक्के भरले . यामुळे सकाळी १० वाजता धरणाचे तीन दरवाजा उघडून १३ क्युसेकने सिंदफना नदी पात्रात विसर्ग काल शुक्रवार दि . ७ रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आला . तत्पूर्वी एका दिवसापूर्वीच प्रशासनाकडून सिंदफगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता . दरम्यान बीड जिल्ह्यात काल रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली . जवळपास ७ महसुल मंडळात ६५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे .   तर ८ महसुल मंडळात ६० मि.मि. पर्यंत झाला आहे . यामुळे कापुस , सोयाबीनचे मोठे नुकसान झाले पाऊस आहे .

   


आतापर्यंत परतीच्या पावसावर हे धरण भरलेले आहे . त्याचप्रमाणे यावर्षी देखील हे धरण पैठणचे नाथ सागर धरण , कुंडलिका व सिंदफना पात्रातुन आलेल्या पाण्यावर हे धरण भरायला चार महिने लागले . पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणात २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता . गुरुवारी हे नदी,

धरण ९९ टके झाले होते . धरण परिसरात रात्री झालेल्या पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून शुक्रवारी सकाळी एका गेट बाट १ ९ क्युसेकने सिंदफना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले . दरम्यान दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोन गेंट उघडून सिंदफणे विसर्ग करण्यात आला . असा एकूण तीन गेटद्वारे १३ क्युसीसने सिंदफना नदी पाणी सोडत पात्रात असल्याची माहिती धरणाचे अभियंता बी . आर . शेख यांनी दिली .

close