जिल्हा परिषद शाळा इमारत धोकादायक
प्रतिनिधी : शिवा म्हस्के
नगर : ७ / नगर तालुक्यातील दहिगाव साकत खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. या विषयी जिल्हा परिषद शाळे विषयी समाज माध्यमातून सर्व प्रकार समोर आणला गेला आहे. सध्या हि इमारत कधीही चिमुकल्या जीव घेऊ शकते या धोकादायक इमारतीची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. या संबंधित जिल्हा परिषदेचे ठेकेदार, अधिकारी कर्मचारी यांच्या वर कायदेशीर कारवाई करावी तसेच या शाळेचे ऑडिट करावे शाळा इमारत निकृष्ट बांधकाम मुळे शालेय विद्यार्थीना जिवीतास धोका निर्माण झाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी दोन शिक्षक रिक्त जागा न भरल्याने शाळा गुणवत्ता ढासाळली आहे. तसेच दहिगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक हे गेल्या ११ ते १२ वर्षा पासून दहिगाव येथेच कार्यरत असल्याने दहिगाव ग्रामस्थ शासकीय योजना लाभा पासून वंचित राहत आहे. गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार दाखल करून देखील कोणत्याही प्रकारची दखल न घेतली गेली नाही. शासकीय वेळेत हजर नसणे, मुख्यालय न राहणे अशा विविध कारणांमुळे दहिगाव ग्रामपंचायत ग्रामसेविका यांचीही तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी तक्रार अर्ज द्वारे केली आहे. विविध तक्रार दाखल न घेतल्याने लोकशाही मार्गाने जिल्हा परिषद कार्यालय समोर सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के उपोषणाला बसणार आहेत.

