shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

० ते २० पट संख्या असलेल्या मराठी शाळा बंद झाल्यास बहुजन समाजाला बरोबर घेऊन तेजपृथ्वी ग्रुप करणार आंदोलन .

० ते २० पट संख्या असलेल्या मराठी शाळा बंद झाल्यास बहुजन समाजाला बरोबर घेऊन तेजपृथ्वी ग्रुप करणार आंदोलन .

तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने इंदापूरचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी यांच्या नावे दिले निवेदन पत्र.

इंदापूर प्रतिनिधी:
सध्या शासनाने मराठी शाळांचा सर्वे करण्याचा तोंडी आदेश दिला आहे, शासनाचा असा उद्देश आहे की ज्या शाळेतील पट २० पेक्षा कमी आहे अशा शाळा बंद करायच्या  याचा अर्थ असा की गोरगरिबांच्या बहुजनांच्या शेतकऱ्यांच्या  मुलाने शिकायचे नाही तर फक्त श्रीमंताच्या मुलांनी शिकायचे.मराठी शाळा बंद करून शिक्षण सम्राट मोठे करायचे असा शासनाचा उद्देश दिसतो आहे. या मुद्द्याच्या  विरोधात दिनांक ७ ऑक्टोबर २०२२  रोजी तेजपृथ्वी ग्रूपने इंदापूर येथे इंदापूर तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्हा शिक्षणधिकारी यांना निवेदन सादर केले.

 

तसेच इंदापूर पोलीस निरीक्षक व गटशिक्षणाधिकारी यांनाही निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की,  शासनाने०ते२० हून कमी पट संख्या असलेल्या शाळांची माहिती जमा करण्याचे आदेश शिक्षण मंत्री यांनी दिली आहेत.  २० पेक्षा कमी पट असणाऱ्या मराठी शाळा बंद करण्याचा डाव असेल तर तो कधीही आम्ही अमलात येऊ देणार नाही. तसेच तेरा वर्षापासून डीएड बंद करून शासनाने अनेकांना बेघर केले आहे आणि जर आता खाजगी शाळा जोमात चालवण्यासाठी व धनदांडग्या शिक्षण सम्राटांना मोठा करण्यासाठी मराठी शाळा बंद पडण्याचा डाव तेजपृथ्वीग्रुप कधीही खपवून घेणार नाही. मराठी शाळा बंद करणे म्हणजेच गरीब, शेतकरी, कष्टकरी, मजूर बहुजनांच्या पोरांना वंचित ठेवून फक्त आणि फक्त श्रीमंतांच्या पोरांना शिक्षण देणे हाच याचा अर्थ आहे. आणि जर शासन गरीब श्रीमंत अशी दरी निर्माण करू पाहत असेल तर त्याची किंमत शासनाला मोजावी लागेल.

मराठी शाळा बंद करण्याचा आदेश शासनाने दिला. तर तेजपृथ्वी ग्रुप या शासनाच्या विरोधात सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन आंदोलन उभारेल आणि होणाऱ्या नुकसानास सर्वोत्तपरी शासन जबाबदार राहील याची नोंद शासनाने घ्यावी अशा आशियाची निवेदन पत्र इंदापूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार ठोंबरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

यावेळी गणेश भाऊ शिंगाडे, उद्योजक लक्ष्मण वाघमोडे,अर्चनाताई गोरड, रूपेश वाघमोडे इत्यादी उपस्थित होते.
close