शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. शुक्रवार दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२२
खडांबे खुर्द येथे १७ वा मतमाऊली यात्रा उत्सव थाटामाटात संपन्न..!!
खडांबे : मतमाऊली यात्रा उत्सव वर्ष १७ वे खडांबे खुर्द येथील लक्ष्मिवाडी परिसरात आयोजित करण्यात आला होता.
स्नेह सदन चर्च राहुरी येथील धर्मगुरू फादर मायकल राजा, सहायक धर्मगुरू फादर मॅथ्यू, प्रमुख पुरोहित म्हणून केंदळ पॅरिस चे प्रमुख धर्मगुरू फादर ऑलविन कें. या धर्मगुरूना आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित भाविक भक्तांचे स्वागत खडांबे येथील ग्रामस्थांनी यावेळी केले.
प्रभू येशूची आईचे महत्व आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहे, एक सर्वसाधारण स्त्री असूनही 'देव' या शब्दाला तिने होकार दिला व म्हणून तर संपूर्ण मानव जातीचे कसे तारण झाले त्याचे महत्त्व त्यांनी उपस्थित भाविकांना पटवून दिले. हा कार्ययक्रम संपन्न होत असतानाच भाविक तल्लीन होऊन मोठ्या भक्तीनेभावाने या कार्यक्रमाचा भक्तीरुपी आस्वाद घेत होते.
तसेच एक ऑक्टोबर पासून रोजरीच्या भक्तीला सुरुवात झाली आहे सर्व कुटुंबियांनी आपल्या घरामध्ये रोजरीची भक्ती करण्यास त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी खडांबे खुर्द गावातून मतमाऊलीची मिरवणूक काढण्यात आलेली होती. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उजनी पिंपळगाव, वांबोरी,सडे, डिग्रस,राहुरी,ब्राह्मणी, खेडले-परमानंद,आदी. गावातील भक्तगण उपस्थित होते.
उपस्थित भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था श्री. भाऊराव साळवे यांच्या वतीने करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे नियोजन संत तेरेजा लहान बाळ येशूची आई मंडळी आणि मदर मेरी युथ ग्रुप खडांबे खुर्द यांनी केले होते. तर या कार्यक्रमाकरिता स्नेह सदन चर्च राहुरी येथील धर्मगुरू फादर मायकल राजा, सहायक धर्मगुरू फादर मॅथ्यू, यांचे विशेष सहकार्य लाभले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

