प्रकाश गाडे यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई :-आधीच स्पष्ट करत आहे; उद्धव ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात द्वेष अजिबात नाही की मनात काही नाही. पण, शिवसेनेची झालेली वतावाहत हे उद्धव ठाकरेंनी पडद्याआडुन केलेल्या कारस्थानामुळे झाली हे आता अधिक गडद होत आहे. तुम्हाला वाटेल की, उद्धव ठाकरे असं का करतील? त्यांचा तर पक्ष आहे? असं केलं तर त्यांचं नुकसान होईल?
वरील सर्व गोष्टी जरी तुमच्या खऱ्या असल्या. पण, एक गोष्ट तुम्हा सर्वांच्या लक्षात येत नाही. की, उद्धव ठाकरे दयाळू आहेत ते दाखवण्यासाठी, संयमी आहेत ते दाखवण्यासाठी, शांत आहेत ते दाखवण्यासाठी. उद्धव ठाकरे यांचा खरा गुण जो लोकांच्या लक्षात येत नाही कारण त्यांच्या चेहऱ्यावर साळसूदपणाचा आव असल्याने. पण, आता मी हेच सांगणार तुम्हाला आहे उदाहरणासह.
काल - परवा, प्रसारमाध्यमात शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांचा बाईट होता. सुरेश नवले पत्रकारांना दिलेल्या बाईट मध्ये असं म्हणाले की, "१९९६ - ९७ ला भाजप - सेना युतीचे सरकार स्थापन होत होते, तेंव्हा उद्धव ठाकरे यांनी सुरेश नवले व चंद्रकांत खैरे यांना बोलावून असं सांगितलं की, बाळासाहेबांना सांगा, मला ( उद्धव ठाकरे ) मुख्यमंत्री करा" स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरेंची क्षमता माहिती होती. म्हणून, त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री न बनवता त्यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदी बसवले.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, उद्धव ठाकरे खुर्चीसाठी १९९६ पासूनच होते. उद्धव ठाकरेंच्या हातातून एक संधी गेली. १९९६ पासून उद्धव ठाकरे अश्या दुसऱ्या संधीची वाट बघतच होते.पण, दुसऱ्यांदा जर संधी मिळाली तर पक्षातील सक्रिय , वरिष्ठ जनतेतील लोकनेते, त्यांच्या समोर मोठी अडसर ठरणार होते. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी विशेष मोहीम हाती घेतली. ती म्हणजे शिवसेनेतील लोकमानस असलेल्या नेत्यांना एक एक करून पक्ष सोडायला भाग पाडणे. इथूनच उद्धव ठाकरे यांचं मिशन मुख्यमंत्री सुरु झाले.
उद्धव ठाकरे यांनी भविष्यात जर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याची संधी मिळाली तर पक्षातील जे खमके नेते आहेत त्यांना ती संधी मिळण्याच्या आधी पक्षातून बाहेर केलं पाहिजे. ह्या हेतूने त्यांनी एक एक करण्यासाठी कट कारस्थाने रचू लागले. त्यात पहिले कारस्थान अस की, या नेत्यांना बाळासाहेबांपासून दूर कसं ठेवता येईल याची काळजी घेण्यात आली. यात उद्धव ठाकरेंच्या मदतीला किचन मॅनेजमेंटचा हात होताच.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भेट होत नसल्याने, साहजिकच नेत्यांमध्ये असवस्थेचा वातावरण तयार होतोच. संवाद एकतर्फी होत होता. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा दुवा हे उद्धव ठाकरे एकमेव असल्याने थेट असा संपर्क कुणाचाही येत नव्हता. त्यात २००३ मध्ये अचानकपणे उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात कार्याध्यक्ष पदाची माळ पडली. त्यातून आणखी हे गडद होत गेलं की, उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या इतर नेत्यांबद्दल काहीतरी चुकीचं भरवण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे हे राजकारणाचा चेहरा नव्हता तरीही त्यांना पक्षाचे कार्याध्यक्ष पद देण्यात आला. इथून सुरू झाला शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या एकाधिकार शाहीचा प्रत्यक्ष उगम. जे आधी पडद्याआडुन होता. उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले त्यानंतर शिवसेनेच्या कार्यक्षम नेत्यांचे खच्चीकरण करण्याची सुरवात झाली यात सर्वात आधी पक्ष सोडला तो नारायण राणे यांनी, त्यानंतर राज ठाकरे यांनी. राज ठाकरे यांनी पक्ष सोडताना नेहेमीच त्यांच्या भाषणात उल्लेख करतात " बाळासाहेबांचे माझ्यावर प्रेम होते, पण, काही बडव्या मुळे मला पक्ष सोडावा लागला. बडव्या कडून राज ठाकरे व सेनेच्या अन्य नेत्यांबद्दल चुकीचं फिडिंग होत आहे, अस राज ठाकरे वारंवार आपल्या भाषणात म्हणून दाखवत होते.
राज ठाकरे यांच पक्ष सोडणे बाळासाहेबांना देखील वेदना देणारं होतं. कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची कोणतीही समजूत घातली नाही. त्यांना जाऊ दिलें कारण, जे उद्धव ठाकरेंना हवं होतं तेच घडत होतं. उद्धव ठवकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या मार्गातील मोठा अडसर नारायण राणे बाहेर पडल्याने निघून गेला. त्यानंतर एका वर्षात शिवसेनेला मोठा धक्का बसला जेंव्हा राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली. शिवसेना सोडताना डझनभर आमदार घेऊन नारायण राणे बाहेर पडले. नारायण राणे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला. ज्या कारणांमुळे राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडचिट्ठी दिली त्याच कारणांमुळे नारायण राणे यांनी देखील सोडचिठ्ठी दिली.
उद्धव ठाकरे सारख्या कर्तृत्व नसलेल्या व्यक्तीच्या हातात पक्ष आहे, त्या व्यक्तीकडून इतर जेष्ठ नेत्यांची कुचंबणा होत आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांना अंधारात ठेवत आहेत. असे वारंवार आरोप राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्याकडून त्यावेळी होत होता. बाळासाहेब स्वतः ही दुःखी होते दोघांच्या जाण्याने त्यांनीही अनेकदा त्यांच्या भाषणात बोलून दाखवल की, "मी दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला पण, त्यांनी आपल ठरवलं होतं". यातून एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित होते की, स्वर्गीय बाळासाहेबांनी दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, उद्धव ठाकरेंनी तसा प्रयत्न केल्याचे कधीही त्यांच्या स्वतःच्या भाषणातून किंव्हा कधी कुठं वर्तमानपत्रात वाचण्यात आलेलं नाही. अश्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या 'मिशन मुख्यमंत्री' मार्गातील दुसरा अडसर सहजपणे दूर केला.
उद्धव ठाकरे हे खुनशी स्वभावाचे आहेत. हे आपण अडीच वर्षात बघितलचं आहे. १९९६ ला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होयचे पण, मनोहर जोशी यांच्या मुळे त्यांना होता आलं नाही. हा राग त्यांच्या मनात कायमस्वरूपी होता. योग्य संधी मिळताच दसरा मेळाव्यात त्यांना व्यासपीठावरून खाली उतरायला लावणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशी बद्दल असलेला राग बाहेर आला.
उद्धव ठाकरेंना १९९६ ला युती सरकारच्या मुख्यमंत्री पदी बसायचं होतं. पण त्यांना बसता आलं नाही. त्यानंतर तब्बल १५ वर्षे राज्यात कोंग्रेस - राष्ट्रवादीच सरकार असल्याने त्यांना जमलं नाही असं म्हणता येणार नाही. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी काहीही करतील ही गोष्ट लपून राहिलेली नाही. मागील आघाडी सरकारच्या १५ वर्षाच्या काळातही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी मला बसवा मी समर्थन करतो असं म्हणाले असते. पण, बाळासाहेब ठाकरे हयात होते म्हणून त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. पण, तरीही त्यांची महत्वकांक्षा काही संपली नव्हती.
१९९६ नंतर थेट २०१४ ला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदी इच्छा झाली. त्यांनी तशी चाचपणी देखील केली. त्यांनी २०१४ सुरवतीच्या काळात भाजपला पाण्यात बघण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात खुलासा केला होता. यातून एक स्पष्ट होतं की, उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांशी काहीही एक घेणं देणं नाही. २०१४ ला पुन्हा एकदा उद्धव ठाकरेचं स्वप्न भंग झालं. कारण २०१४ ला भाजपचे १२२ अपक्ष मिळून जवळपास बहुमताच्या जवळ होता. त्यामुळं उद्धव ठाकरेच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकत नव्हती.
१९९६ ते २०१९ तब्बल २३ वर्षाच्या कालावधी नंतर उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री पदाच्या आशा पल्लवीत झाल्या. निवडणूक मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नावावर लढवून भाजप सेना युतीला बहुमत मिळवून दिलं. भाजपला १०५ व शिवसेनेला ५६ सीट्स देऊन जनतेने पुन्हा एकदा भाजप - शिवसेना युतीला निवडून दिले. २०१४ च्या तुलनेत भाजपच्या १७ सीट कमी आले. इथेच उद्धव ठाकरेंनी जनमताशी गद्दारी करून देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला.
मुख्यमंत्री पदी बसवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतःचा बापाची विचारधारेला तिलांजली दिली. स्वतःची खुर्ची गरम करण्यासाठी सर्वांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी भाजप सोबत बनवलेली युती मोडली, ज्यांच्या विरोधात लढत बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्य घालवले त्या विरोधकांशी मोठ बांधून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची हौस भागून घेतली. एवढच नाही उद्धव ठाकरेंनी भविष्यात कोणी आड येऊ नये म्हणून राज ठाकरे , नारायण राणे यांना पक्षाच्या बाहेर काढल.
उद्धव ठाकरे स्वतःला जरी साधे भोळे समजत असतील पण, त्यांचे कौटुंबिक वाद हेच सांगतात की, उद्धव ठसकरेंनी फक्त पक्षातील नेत्यानाच पक्षातून बाहेर काढलं नाहीतर सख्ख्या भावाला,भावजय, पुतण्याला घराबाहेर काढले. आणि हे सगळं उद्धव ठाकरे एकटे करू शकत नाहीत. त्यामागे किचन मॅनेजमेंटचा पूर्ण पाठिंबा होता. उद्धव ठाकरे हे एक पाताळयंत्री आहेत हे आता लपून राहिलेले नाही.

