shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर व बावडा येथे ग्रामस्थांसमवेत दसरा !

हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर व बावडा येथे ग्रामस्थांसमवेत दसरा !
फोटो:- इंदापूर, बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामस्थांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या

इंदापूर : प्रतिनिधी दि.5/10/22
           भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी परंपरेनुसार दसऱ्याचा उत्सव इंदापूर व बावडा येथे नागरिक व कार्यकर्त्यासमवेत बुधवारी ( दि.5)सायंकाळी उत्साही वातावरणात साजरा केला. यावेळी हर्षवर्धन पाटील, युवा नेते राजवर्धन पाटील यांनी रत्नाई व भाग्यश्री बंगलो येथे आयोजित समारंभात उपस्थित शेकडो नागरिकांना विजयादशमीनिमित्त आपट्याची पाने देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
        भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचा व साडेतीन मुहूर्ता पैकी एक असलेला सण म्हणजे दसरा ! यावेळी हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील यांनी सर्वांशी संवाद साधला व वडिलधाऱ्यांचे आशीर्वादही घेतले. त्याचप्रमाणे जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनीही महिला भगिनी, कार्यकर्त्यांना याप्रसंगी  शुभेच्छा दिल्या.
________________________
.
close