श्रीरामपूर : - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान व संसद संघाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. ग्लेन टि मार्टिन यांच्या उपस्थितीत येत्या डिसेंबरमध्ये श्रीरामपूरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी दिली आहे.
डब्ल्यूसीपीएचे अध्यक्ष प्रा.डॉ. ग्लेन टि मार्टिन नोव्हेंबरच्या अंतिम सप्ताहात भारत दौऱ्यावर येत असून या दौऱ्या दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदिपक कार्य करत असलेल्या महाराष्ट्र चॅप्टरचे मुख्यालय श्रीरामपूर येथील प्रसिद्ध विधी महाविद्यालयात व्याख्यान व वकिलांच्या " बार असोशिएशन " सदस्यांना संबोधीत करणे, इंटरनॅशनल अवॉर्ड वितरण समारंभ व सदस्यत्व प्रदान सोहळ्यास त्यांची उपस्थिती असणार आहे.
प्रा.डॉ. ग्लेन मार्टिन यांच्या या दुर्मिळ भेटीत त्यांच्या हस्ते अविस्मरणीय व दुर्मिळ अवॉर्ड डिस्ट्रीब्यूशन सोहळा होणार असल्याने समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या समग्र कार्याची सविस्तर माहिती wcpashrirampur@gmail.com या मेल आयडीवर पाठवायचे असून 9096372082 या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.
कला, क्रिडा, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरण, तांत्रिक, अभियांत्रीक, वैज्ञानिक, वैद्यकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, रक्षा -सुरक्षा, गिर्यारोहण, संगीत, चित्रपट तसेच इतर अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व पुरुषांनी त्वरीत आपले प्रस्ताव पाठविण्यासाठी संपर्क करा.
विविध इंटरनॅशनल अवॉर्ड असलेल्या या पुरस्कारात मानपत्र, सन्मानचिन्ह व जागतिक संसदेचे सदस्यत्व ( वर्ल्ड पार्लमेंट मेंबरशिप ) देण्यात येणार आहे. तरी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे.

