shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"खेड तालुक्यातील प्रदीर्घ प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मा. श्री. सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळाव्याचे आयोजन"

*खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संबंधित असे प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांमध्ये

*सेझबाधित शेतकऱ्यांचा पंधरा टक्के परताव्याचा प्रश्न(१४वर्षे
 प्रलंबित)
*काळुस भागातील चासकमान पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शिक्के काढण्या संदर्भातील प्रश्न(४० वर्षांपासून प्रलंबित)
*चाकणपट्ट्यातील भामा आसखेड पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शिक्के काढण्या संदर्भातील प्रश्न (३० वर्षांपासून प्रलंबित)

        अशा  प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शेतकऱ्यांनी संघटित होऊन शासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून मा. श्री. सदाभाऊ खोत साहेब (मा.  राज्यमंत्री, संस्थापकअध्यक्ष, रयत क्रांती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित राहणार आहेत.

सदर शेतकरी मेळाव्याचे ठिकाण: मौजे काळुस ता. खेड जि.पुणे(राम मंदिर सभा मंडप), वार रविवार दि.३०/१०/२०२२,वेळ: सकाळी १०:०० वाजता असून
मेळाव्याचे आयोजक श्री. गजानन भाऊ गांडेकर,( राज्य प्रवक्ते रयत क्रांती शेतकरी संघटना) श्री. सुभाषराव पवळे (अध्यक्ष,खेड तालुका शेतकरी संघटना)
मा. बाळासाहेब दौंडकर (  कार्याध्यक्ष शेतकरी संघटना खेड) श्री. वस्ताद दौंडकर (जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना) श्री. सुनील पोटवडे( युवक अध्यक्ष संघटना) श्री. अमोल मोहिते (युवा अध्यक्ष) श्री. गणेश शिंदे (उद्योजक) श्री विश्वनाथ पोटवडे श्री. भरत भाऊ आरगडे , श्री बाळासाहेब खलाटे,  विठ्ठलसेट आरगडे, ॲड सुनील लिमगुडे, बाळासाहेब साकोरे, सुदामराव माशेरे (मा‌. पंचायत समिती सदस्य)  मोहन शेठ दौंडकर (मा. पोलीस पाटील)  संतोष दौंडकर, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, काशिनाथ हजारे,भानुदास नेटके,  उत्तमराव कान्हूरकर, निलेश म्हसाडे, ओंकार कान्हूरकर, विश्वास कदम, दत्ताप्पा साकोरे,विलास नाना थिटे, ऋषिकेश चव्हाण,सुदामराव शिंदे, भीमसेन गोरडे, एकनाथ गोरडे यांनी केले आहे. सदर मेळावा रयत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य व शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, खेड. तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे.

         मेळाव्याचे ब्रीदवाक्य"कथाकथित दलाला पासून शेतकऱ्यांना वाचूया!! आणि जमिनी आपल्या सुरक्षित राखूया!!"असे ठरविण्यात आले आहे.आपल्या न्याय हक्कासाठी सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
close