shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केजच्या प्रिया मंगेश मुंडेचे पहिल्याच प्रयत्नात पाँवरलिफ्टींगमध्ये दैदिप्तमान यश..!!

प्रकाश मुंडे  | बीड प्रतिनिधी :-                               
महाराष्ट्र राज्य पाँवरलिफ्टींग अशोसियशन अंतर्गत महाराष्ट्र राज्य बेंचप्रेस अजिंक्यपद  स्पर्धा -२०२२ इंदापुर (पुणे) येथे झाली. यात बीड च्या प्रिया मंगेश मुंडे यांनी पहिल्याच प्रयत्नात रौप्य व कांस्य पदक पटकावले आहे.                            

बीडच्या प्रिया मंगेश मुंडे यांनी काही वर्षापासून हे धाडसाचे पाँवरलिफ्टींगमध्ये करिअर निवडले आहे.त्यांना दोन मुले आहेत. पुणे इंदापुर येथील स्पर्धेसाठी त्या २०अक्टोबर रोजी गेल्या होत्या. रविवारी २३अक्टोबर रोजी त्यांनी दोन्ही पदके पटकावले आहेत. त्यांनी  यापूर्वी देखील विविध स्पर्धेत पदके पटकावले आहेत. प्रिया मंगेश मुंडे यांचे मुळगाव धारूर तालुक्यातील कासारी बोडखा हे आहे. 

त्यांचे वडील श्री बाबासाहेब बडे हे पोलिस दलात सहाय्यक पोलिस  निरीक्षक पदावरून सेवानिव्रत झाले आहेत. त्यांनी कुटुंबातील मुला मुलींना  उच्च शिक्षणासाठी  प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या प्रेरणेतुनच  प्रिया मंगेश मुंडे यांनी विद्यान या शाखेतुन पदवी संपादन केली आहे. आच.आर आणि मार्केटिंग एमबिए हि पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी बीड मध्ये प्रिया फिटनेश  सेंटर सुरू केले आहे. मागील नऊ वर्षापासून पोलिस कर्मचारी ,युपियस्सी, एमपीएससी विद्यार्थी, लहान मुले ,रुग्णांसाठी मोफत योगा प्रशिक्षण देऊन सेवा करण्याचा पायंडा प्रिया मंगेश मुंडे यांनी रूजवला आहे. त्यांची नॅशनल पाँवरलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

या यशाबद्दल त्यांचे सर्वस्ञ  कौतुक होत आहे. त्यांचे मोठे दिर  डॉ. सुरेश मुंडे. डॉ. सौ.मुंडे. मोठे बंधु  मधुकर बडे,  कमलाकर बडे, व कुटुंबातील सर्व मंडळी तसेच बीड जिल्ह्यातील सर्व मान्यवरांकडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
close