शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २८ ऑक्टोंबर २०२२
प्रसाद शुगर कडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनाकापात २३००/- रुपये प्रती मे. टनाप्रमाणे प्रथम उचल जाहीर- कार्यकारी संचालक सुशिलकुमार
देशमुख..!!
देशमुख..!!
राहुरी (वांबोरी) : राहुरी तालुक्यातील प्रसाद शुगर अँड अलाईड एग्रो प्रॉडक्टस् लिमिटेड वांबोरी या कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२२-२३ या हंगामात गळीतास आलेल्या ऊसास विनाकापात रक्कम रुपये २३००/- रू. प्रती मे. टन प्रमाणे प्रथम उचल म्हणून ऊसाचा दर कारखाना व्यवस्थापनाने जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. सुशिलकुमार देशमुख साहेब यांनी दिली आहे.
गळीत हंगाम सन २०२२-२३ साठी कार्यक्षेत्रामध्ये ९ ते १० लाख मे. टन ऊस गळीतास उभा आहे कारखाना व्यवस्थापनाने सन २०२२-२३ साठी ८ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
ऊस उत्पादकांच्या उसाचे वेळेत गाळप होण्यासाठी प्रतीदिन ५००० मे. टन उसाचा पुरवठा करणारी सक्षम तोडणी-वाहतूक यंत्रणा हजर झालेली आहे.
ऊस उत्पादक यांच्या ऊस तोडणी करीता नियोजन हे प्रोग्राम प्रमाणे सूरू झाले असून गळीत हंगाम चालू झालेला आहे.
"प्रसाद शुगरने आत्तापर्यंत ऊस उत्पादकांच्या उसाच्या वजनाबाबत पारदर्शीपणा ठेवलेला आहे. यापुढेही प्रसाद शुगर असेच वजनाबाबत पारदर्शकपणा ठेवील म्हनून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस प्रसाद शुगर कारखान्यास द्यावा असे कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. सुशिलकुमार देशमुख साहेब यांनी यावेळी सांगितले."
प्रसाद शुगर ने रक्कम रुपये २३००/- प्रती मे. टना प्रमाणे प्रथम हप्ता जाहीर केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.
तसेच या गळीत हंगामात गळीतास आलेल्या उसाचे नेहमी प्रमाणे नियमित पंधरवडा पेमेंट अदा केले जाणार आहे.
गळीत हंगाम २०२२-२३ गळीतासाठी उभा असलेल्या संपूर्ण ऊस गाळपाकरीता प्रसाद शुगर ला देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे.
प्रसाद शुगर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प पूर्णत्वास आलेला असून या गळीत हंगामात सदर प्रकल्प चालू होणार आहे.
त्यामुळे यापुढील काळात कारखान्यास इतर कारखान्यांचे बरोबरीने ऊस दर देणे शक्य होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. सुशिलकुमार देशमुख साहेब यांनी दिली आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600