shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेलापूर महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी


शौकतभाई शेख श्रीरामपूर:
तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा अस्तेय, अपरिग्रह व शांततेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ची घोषणा देऊन या देशातील सैनिकांना आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला या दोन महान नेत्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील व राष्ट्र उभारणीतील कार्याचे स्मरण करून बेलापूर महाविद्यालयाने त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे सर्व प्राध्यापक प्राध्यापके तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
close