shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवजीवन विद्यालयात म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

प्रतिनिधी : प्रविण देशमुख

दहिगाव-ने : २ / शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जगाला अहिंसा,सत्य आणि सहिष्णुता यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच जय जवान जय किसान घोषणेचे प्रणेते भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस तसेच स्व.लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.अशोक उगलमुगले,उपप्राचार्य श्री.शंकर कांबळे,पर्यवेक्षक श्री.सुनिल शिंदे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.अशोक उगलमुगले  होते.विद्यालयामध्ये जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये एकूण ४९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री या थोर नेत्याबद्दल आपले विचार मांडले.

या वकृत्व स्पर्धेचे परीक्षण श्री.देवराम सरोदे,दिपक खरात,बापूसाहेब लोढे व आप्पासाहेब खंडागळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री.राजेंद्र पानगव्हाणे यांनी केले तर आभार श्री.बाळासाहेब मोहिटे यांनी मानले.
close