कोपरगांव । प्रतिनिधी (इब्राहिम शेख ):
तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या मायगांव देवी येथील जगदंबा मातेचे आमदार आशुतोष (दादा) काळे यांनी दर्शन घेतले.
जगदंबा मातेच्या दर्शनासाठी ते मायगाव देवी येथे आले असता मंदिर पुजारी आणि ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला, आमदार काळे यांनी यावेळी उपदेशपर दोन शब्द बोलून सर्व ग्रामस्थांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सुदामराव गाडे, श्रीकृष्ण गाडे, प्रभाकर गाडे, मायगाव देवी चे सरपंच दिलीप शेलार, उपसरपंच मुकुंदराव गाडे, सदस्य शरदराव भुसारे, पुजारी पुंजाराम भगत, अशोक भगत, शरदराव गडाख, सखाहरी खर्डे, सुनील गाडे, रामराव चुंबळे,जनार्धन गाडे, काशिनाथ गाडे तथा गावातील ग्रामस्थ, महिला मंडळ आदी भाविक भक्त कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

