shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवी सप्तशृंगी, नवरात्र उत्सव

नवरात्र विशेष लेख : सातवा

लेखक : 
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने, 
मो. ९८८१३७३५८५


सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो।
तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो।
जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो।
भक्त संकटी पडतां झेलूनी घेसी वरचेवरी हो।

सप्तशृंगीचा डोंगर हा दंडकारण्याचा भाग नासिक जिल्ह्यातील नांदुरी गावाजवळ असून राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे उल्लेख आढळतात. महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी सप्तशृंग गडावर वास्तव्य केले. महानुभावी लीळाचरित्रातात उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला त्या वेळी संजीवनी वनस्पतीच्या शोधात हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग जेथे जेथे खाली पडला त्याचाच एक भाग हा सप्तशृंगगड होय. आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीच्या आशीर्वादाने शाबरी विद्येची सुरुवात सप्तश्रृंगी गडावरून झाली याची रंजक माहिती नवनाथ भक्तीसार पोथीच्या दुसऱ्या अध्यायात वर्णन केलेली आहे. निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस सप्तशृंगी गडावर उपासना केली होती.  सुरतेची स्वारी यशस्वी करून परतत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीचे दर्शन घेतले असा संदर्भ बखरींमध्ये आढळतो. 

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्तींवर अनेक वर्षे चढविलेला शेंदूराचा लेप नुकताच विधीपूर्वक काढण्यात आला. या शेंदूराचे वजन सुमारे दोन हजार किलो भरले. देवीच्या भव्य रूपाची कल्पना यातूनच येते. त्यामुळे श्री सप्तशृंगी देवीच्या अठरा हात व आभूषणांनी अलंकृत अशा अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्तीचे दर्शन आपणास घडते. 

सप्तशृंगीगड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ असून अनेकांचे  आराध्यदैवत आहे. सप्तशृंगी देवीचे हे तीर्थक्षेत्र ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप असून आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे. देवीचे अठरा हात व सप्तशृंग असे रूप आहे. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचे शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सवही साजरा केला जातो.  शाकंभरी देवी नवरात्रीची सुरुवात आई शाकंभरीपासून झालेली असून ज्यांचे शक्तीपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे.

close