shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर सोनाई बजाज शोरूम येथे माजी सैनिकांच्या हस्ते बजाज ऑटो कंपनीच्या नवीन दोन गाड्यांचे अनावरण.

इंदापूर सोनाई बजाज शोरूम येथे माजी सैनिकांच्या हस्ते बजाज ऑटो कंपनीच्या नवीन दोन गाड्यांचे अनावरण.

माजी सैनिक सुभाष थोरात, रविराज पवार व संपत फलफले यांच्या हस्ते सि.टी. एक्स. १२५ व
 पल्सर एन १६० झाले अनावरण.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील सोनाई बजाज शोरूम येथे स्वदेशी कंपनी असलेली बजाज ऑटो या कंपनीने देशासाठी योगदान देणारे माजी सैनिक यांच्या हस्ते बजाज ऑटो ची सि.टी. एक्स. १२५(C TX 125) व पल्सर एन १६०( pulsar N 160) या दोन गाड्यांचे अनावरण जय हिंद आजी-माजी सैनिक संघटनेचे सुभाष थोरात , रविराज पवार, संपत फलफले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एरिया सर्विस मॅनेजर मनवेंद्र कुमार, एरिया सेल्स मॅनेजर निविदिता सिंग, सोनाई बजाज शोरूम चे मॅनेजर रविंद्र पवार, सोनाई बजाज शोरूम चे कर्मचारी व ऑटोमोबाईल क्षेत्रातील दुकानदार आणि फिटर उपस्थित होते.
यावेळी सिटीएक्स १२५ या गाडी संदर्भात माहिती देताना सांगितले की, ही गाडी दणकट असून शेतकऱ्यांच्या कामासाठी सुखकारक आहे. तसेच या गाडीला पर लिटर ७५ किलोमीटर आवरेज आहे व १२५ सिसी चे इंजन असल्यामुळे पिकप ला आणि कच्चा रस्त्याला ही गाडी चांगल्या पद्धतीने चालते तसेच पल्सर एन १६० ही गाडी स्पोर्ट गाडी म्हणून ओळखली जाते. चालवण्यासाठी उत्तम असून सस्पेन्शन आणि बसण्याची व्यवस्था चांगली असल्याने लांब पल्ल्यासाठी या गाडीचा उपयोग होतो अशी माहिती एरिया सर्विस मॅनेजर मनवेंद्र कुमार, एरिया सेल्स मॅनेजर निविदिता सिंग यांनी दिली.
close