shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन साजरा.


इंदापूर येथे आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन साजरा. 

ज्येष्ठांसाठी आयोजित करण्यात आलेला विनोदी व हास्य कलाकार  संतोष नरूटे यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
इंदापूर प्रतिनिधी: ज्येष्ठ लोकांशी जगात होणारे गैरवर्तन आणि अन्याला रोखण्यासाठी व लोकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा होणे गरजेचे आहे असाच ज्येष्ठ नागरिक दिन इंदापूर येथे साजरा करण्यात आला.
एक ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त  ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर या संस्थेमध्ये बहुसंख्य सभासदाच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमांस विनोदी व हास्य कलाकार  संतोष नरूटे यांनी सभासदांना भरपूर आनंदी व हसत राहण्यासाठी चांगल्यापैकी विनोदी  हा कार्यक्रम केला.
 संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी सर्व ज्येष्ठांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ लोकांशी जगात होणारे गैरवर्तन आणि अन्याला रोखण्यासाठी व लोकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण होण्यासाठी १४ डिसेंबर १९९० रोजी हा निर्णय घेण्यात आला की एक ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जावा. 
प्रत्येक वर्षी एक ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. खरं तर जेष्ठांचा सन्मान व त्यांच्या प्रति आपल्या मनात असलेला आधार व्यक्त करण्यासाठी वडीलधारांच्या कर्तव्याला संबोधित करण्यासाठी हा दिवस निश्चित केलेला आहे.
 ज्येष्ठांनी आनंदी व सतत हसत राहावे असे त्यांनी सर्व ज्येष्ठांना विनंती केली.
कार्यक्रमास उपाध्यक्ष पांडुरंग जगताप ,भाऊसाहेब खाबले, सचिव हनुमंत शिंदे ,मार्गदर्शक बाबासाहेब घाडगे, भानुदास पवार व संचालक प्रमोद भंडारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन  सुभाष महाजन सर यांनी केले.
close