shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली प्रशांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट.

संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे  व आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली प्रशांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट
इंदापूर प्रतिनिधी: संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे या २८ सप्टेंबर २०२२ रोजी इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन या कार्यक्रमासाठी दौऱ्यावर असताना त्यांनी बावडा गावातील माजी पंचायत समिती सभापती प्रशांत पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी दिवसभराच्या असलेल्या दौऱ्यातून अनमोल असा वेळ काढून प्रशांत पाटील कुटुंबीयांसाठी वेळ  देऊन भेट घेतल्याबद्दल व आपुलकीने कुटुंबीयांशी सुसंवाद करून चहापान घेतल्याबद्दल प्रशांत पाटील यांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच यावेळी उसाच्या विषयासंदर्भात ही चर्चा झाल्याचे संग्रामसिंह पाटील यांनी सांगितले

यावेळी माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर ,इंदापूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जि.प सदस्य मा.श्रिमंत ढोले,अॅड.प्रदीप पाटील,अजित टिळेकर,विजय घोगरे,सुरेश शिंदे,दत्तात्रय घोगरे,अभिजित घोगरे,नागेश गायकवाड,शितल कांबळे,अशोक चव्हाण,जालिंदर गायकवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

पाटील कुटुंबीयातील प्रशांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्रामसिंह पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.
close