1)
गांधीजी..
ब्रीद वाक्य बापूंचे
अहिंसा परमो धर्म
धर्माच्या नावे युद्ध
आमचे असे कुकर्म
स्वच्छता प्रिय तया
आम्हा न कळे मर्म
मन आमचे गलिच्छ
तरीही न वाटे शरम
स्वातंत्र्यास्तवतुरूंग
सोसला त्रास चरम
आम्ही जातो तुरूंगा
फक्त करून कुकर्म
त्यांने केले आंदोलन
हिंसाचार माझा धर्म
नोटेवरचे ते गांधीजी
प्रियतम आहेत परम
पीडा पराई जानी रे
कळले ना कधी मर्म
स्वार्था साठी सहज
बनतो आम्ही बेशर्म
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
www.kavyskusum.com
2)
गांधीजी ..
बापूजी आपणावर
प्रेम आमचे अलोट
चित्र छापलेआपले
म्हणूनि आवडे नोट
आपले नाव घेऊनि
अजूनि मागतो वोट
योजनेला नाव तुझे
आमचे भरते पोट
दंगलही तुझ्या नावे
नरडीचा घेतो घोट
राही नामा निराळे
बंदोबस्त कडे कोट
गांधीपथ नाव देता
पवित्र जाहली वाट
पुतळे ते जागोजाग
उभे करी सत्रा साठ
गांधीजयंती साजरी
आगळाचं असे थाट
उत्सव एकचं दिवस
प्रेम उतू जाईअफाट
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.
www.kavyakusum.com
3)
महात्माजी ..
शांतमार्गाने सुटतो
कठीण प्रश्न सुध्दा
पटायला हवा मात्र
लाख मोलाचा मुद्दा
आडव्या वाटा नको
रस्ता चांगला साधा
एकजूट हवीअभेद्य
अवघड व्यूव्ह भेदा
मीठ सत्याग्रह बापूं
आठवे पुन्हा एकदा
बापूं मुळे शोभे नोट
कींमत नसे कागदा
दीडशेवर्षे रोग जुना
इंग्रजांचा केला खुर्दा
अहिंसक हा योध्दा
कोटीत असे एखादा
शांतीअहिंसा जपता
दूर पळतीलं विपदा
मुश्किलीने मिळवली
जपा स्वातंत्र्य संपदा
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
www.kavyakusum.com
४)
गांधी जयंती ...
वेगळी करूया यंदा
साजरी गांधीजयंती
मनाची करू सफाई
लावू एखादी पणती
नियंत्रण क्रोधावरती
ते जमेल प्रयत्नांती
मनावर होता ताबा
नांदेलं सर्वत्र शांती
भाषणबाजी नको रे
श्रध्दा ती मौनावरती
कर्म योग महा योग
करूया कर्तृत्व पूर्ती
गांधीवादी तेचि खरे
जे परपीडा जाणती
खादीचा का हट्टहास
एक दिवशी आपर्ती
स्वातंत्र्य दिले त्यांनी
जपणे आपले हाती
आशीष द्यावा वरुन
बापूंना अशी विनंती
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
www.kavyakusum.com

