shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हेमंत मुसरिफ यांच्या छान कविता..

शास्त्री जयंती ...

छोटीशी  जरी  मूर्ती 
दिगंतरा जाय किर्ती 
करूया जन जागृती 
आज शास्त्री जयंती

साधी सरळ  राहणी
निस्पृहताअनासक्ती
भय तया न माहिती
वादातीत देश भक्ती

कार्यकाल जरीकमी
उतुंग  तयाची महती 
नव्या   युगास  आहे 
बरीचं अल्प माहिती 

जय  जवान किसान 
ती मशाल धगधगती
आचारणी ये  विचार 
उजळू लक्षलक्ष वाती 

बापुजींच्या  समावेत
त्यांचीही असे जयंती
दुग्धशर्करा छान योग
आदरांजली मनशांती


२)
शास्त्री जयंती ..

शास्त्री लाल बहाद्दुर
आगळेचं पंत प्रधान
नाराआवडता त्यांचा
जय जवान  किसान

शरीराची उंची बुटकी
कर्तृत्व  उत्तुंग  महान
मुलांत रमता खेळता
बनती  तसेचं  लहान

भीती  माहीत नव्हती
सतर्क सदैव अवधान
भारता मिळवून दिला
विश्वात आगळा  मान

भारत रत्न  मानकरी
पुरस्कारा  ये सन्मान
स्वातंत्र्यसेनानी असा
झाला ना तुज समान

निस्पृह ते  कर्म योगी
जनसेवा तीव्र  तहान
दुर्दैव  आपलेचं  मोठे
आयु रेषा तव  लहान



३)
गांधी शास्त्री जयंती ..

दुग्ध शर्करा  योग हा
शास्त्री गांधी  जयंती
भारतभूची दोन रत्ने
भारताआणे उत्क्रांती

भारताआल्या जन्मा
अनमोल या  विभूती
लोटत  आले  शतक
वेगळी  येई अनुभूती

विचार कण  वाचता
उजळते परत  स्मृती
आचार क्षणअनुभव
उजळे हिन्दू संस्कृती

शब्द  पडती  तोकडे
गाता जाणता महती
नव्या पिढीला द्यावी
जुन्याने  ती  माहिती

स्वातंत्र्यास्तवआहुती
या  लक्ष लक्ष ज्योति
स्वातंत्र्यसांभाळू नीट
तेव्हाचं साजरीजयंती

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996.
  www.kavyakusum.com







close