येणाऱ्या पुढच्या हजारो वर्षांमध्ये आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांचा इतिहास हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल-
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील.
राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान निमसाखर यांच्या वतीने आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती उत्साहात साजरी.
इंदापूर प्रतिनिधी:आजही २३१ वर्ष झालं येणाऱ्या पुढच्या हजारो वर्षांमध्ये आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांचा इतिहास हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. अशा पद्धतीचे काम त्यांनी या माध्यमातून केलं आहे असे उद्गार माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निमसाखर येथील आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
निमसाखर येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांच्यावतीने २३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ते निमसाखर बस स्थानक परिसरात उमाजी नाईक पुतळ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निरभीमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक भटक्या विमुक्त क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लखन चव्हाण , संजय चव्हाण, बाबुराव रणवरे, धैर्यशील रणवरे, अनिल बोंद्रे, रमेश गोरे, काका पाटील, उमाजी बोडरे ,समाधान चव्हाण, रघुनाथ चव्हाण, मयूर खोमणे, विजय चव्हाण, तानाजी बोडरे, पप्पू मांडले ,बाबा बोडरे, प्रमोद खोमणे ,पप्पू चव्हाण संघटनेतील सर्व पदाधिकारी इंदापूर तालुक्यातील समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की,निमसाखर येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती आज आपण अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आपले प्रदेशचे अध्यक्ष लखन चव्हाण आपल्या निमसाखर गावचे माजी सरपंच आपले तरुण सहकारी लालासाहेब चव्हाण आणि आलेले सर्व समाज बांधव बंधू भगिनी यांचे स्वागत करतो. पाऊस पडत असतानाही अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती आपण साजरी करतो आहे. मी त्यांच्या प्रतिमेला मनापासून अभिवादन करतो. गेल्या दहा-पंधरा दिवसापूर्वी आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आले होते. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या मूळ ठिकाणी जाऊन आदरांजली वाहून अभिनंदन केले. आज सुदैवानं सगळा तरुण वर्ग एकत्र या ठिकाणी आलेला आहे. आमचे सहकारी लालासाहेब चव्हाण यांनी खूप चांगली तयारी केली होती. परंतु पाऊस एवढा मोठा झाला आहे की आपल्या सर्वांची गैरसोय झालेली आहे त्यानिमित्ताने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आहे. निश्चित पणाने इंदापूर तालुक्यामध्ये हा जो सगळा रामोशी समाज बांधव आहे. हा आपला आहे. आपण त्या कुटुंबातील आहोत. आणि अतिशय मनापासून पिढ्यानपिढ्या इंदापूर तालुक्यामध्ये हा सगळा रामोशी बांधव समाज आहे. तो आपला आहे आपण त्या कुटुंबातील आहोत. आम्ही समाजा बरोबर आहे.इंग्रजांच्या काळामध्ये आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांनी जे बंड पुकारलं आणि त्या काळामध्ये जी लढाई केली आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा सिंहाचा वाट आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रतिमेला आपण अभिवादन करूया. त्या काळामध्ये देशद्रोही म्हणून त्यांच्यावर इंग्रजांनी गुन्हा दाखल केला. म्हणून इंग्रजांनी ज्या पद्धतीने अन्याय केला व त्यांना फसावं लटकवण्याचं पाप इंग्रजांच्या माध्यमातून घडलं.
आजही २३१ वर्ष झालं येणाऱ्या पुढच्या हजारो वर्षांमध्ये आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांचा इतिहास हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. अशा पद्धतीचे काम त्यांनी या माध्यमातून केलं आहे.
या कार्यक्रमाचे आभार राजे उमाजी नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लालासाहेब चव्हाण यांनी मांडले.
-------------------------------------------------------------------
चौकट:
राज्य सरकारच्या वतीने मदतीने युवकांच्या व संघटनेच्या भावना आहेत त्यास पूर्ण मदत आमच्या सहकाऱ्यांना देण्यामध्ये आम्ही कोणी कमी पडणार नाही- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
मी आमच्या समाज बांधवांना एवढेच सांगणार आहे. जे काही आपल्याला राज्य सरकारच्या वतीने मदत पाहिजे. जे काही युवकांच्या भावना आहेत. संघटनांच्या भावना आहेत .त्या निश्चितपणाने एकत्र पणाने एक बैठक हे आपण मुंबईला करू आणि सुदैवानं सरकार आपल आहे .पूर्ण मदत आमच्या सहकाऱ्यांना देण्यामध्ये आम्ही कोणी कमी पडणार नाही .अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने देऊ इच्छितो. आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला होता .मी तर काल दिल्लीला होतो .पण ठरवलं की, आपल्या कार्यक्रमाला यायचं. कारण शेवटी ही सगळे आपल्या एका कुटुंबातले आहेत. आपल्या परिवारांमधले आहेत. आणि आपण सर्वजण एकत्र राहून निश्चितपणाने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ताकतीने आपण अन्यायाच्या विरोधात लढण्याचे काम आपण करूया. एवढेच या निमित्ताने सांगू इच्छितो.

