लाखेवाडी युवाशक्ती ग्रुपच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी.
थोर पुरुषांच्या जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार आपल्या मध्ये रुजावेत - गणेश बागल संघटक लाखेवाडी युवाशक्ती ग्रुप.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावातली युवाशक्ती ग्रुपच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन सर्व युवकांच्या वतीने (दि.२ ऑक्टोबर)करण्यात आले.
यावेळी गणेश बागल,मनोज नाईक,बंटीभाऊ जाधव,अभिजीत नाईक,विकास जाधव,रवि थोरवे, मल्हार खाडे हे उपस्थित होत.
यावेळी गणेश बागल यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की,आपल्या ग्रूप ने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे.त्यामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी थोर पुरुषांनी आपले जीवन समर्पित केले, अश्या सर्व थोर पुरुषांची जयंती साजरी करायची असं ठरवलं आहे. या उपक्रमाचं गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांकडून स्वागत होत आहे.
थोर पुरुषांच्या जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार आपल्या मध्ये रुजावेत त्याच्या सारखं आपल्या हातून थोड तरी सामजिक कार्य घडावं असे आपण सर्व मिळून प्रयत्न करूयात .

