स्वावलंबनाच्या दिशेने कूच
प्रतिनिधी : गणेश बोरा , करमाळा
करमाळा: २ / उठा...उठा दिवाळी आली...मोती स्नानाची वेळ झाली... या मोती साबणाची मोहक जाहिरात सुरू झाली की दिवाळी जवळ आलीय याचा भास व्हायला सुरुवात होते...
आनंद आणि उत्साहाने साजरा होणारा हा सण म्हणजे आपल्यासाठी एक पर्वणीच जणू आणि हीच यंदाची दिवाळी आणखी सुंदर आणि विशेष करण्यासाठी आपल्या ह्या विशेष आणि निरागस लेकरांनी आमच्या मदतीने रंगवलेले दिवे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत...एका छोट्याश्या दुष्काळग्रस्त खेडेगावात विशेष मुलांसाठी सुरू असलेला हा निवासी प्रकल्प आणि त्यात स्वावलंबनाच्या दिशेने कूच करण्यासाठी सुरू केलेले हे विविध उपक्रम आणि त्या उपक्रमाला आपण देत असलेला उत्तम प्रतिसाद याच खरच कौतुक वाटतं आणि त्यामुळेच या नवनवीन गोष्टी करण्यासाठीची ऊर्जा मिळते...इतर उपक्रमा प्रमाणेच या उपक्रमाला देखील आपण भरपूर प्रमाणात प्रतिसाद द्याल याची खात्री आहे.
आपण हे सुंदर दिवे घेतलेत तर आपल्या प्रकल्पाला काही आर्थिक पाठबळ मिळेल आणि एका सामाजिक कार्याला आपला हातभार लागला ह्या भावनेच्या जाणिवेचा आनंद काही औरच.. .त्यामुळे आपल्या मुलांच्या ह्या सोनेरी क्षणाचे आणि या दिवाळीत या सुंदर दिव्यांचे सोबती होण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर एसएमएस, व्हाट्सअप्प किंवा इनबॉक्स द्वारे संपर्क साधण्याचे रोहित बागडे मो . 9987654721(ज्ञानप्रबोधन मतिमंद निवासी विद्यालय) कोर्टी. ता.करमाळा जि.सोलापूर यांनी आवाहन केले आहे .

