प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित 'जागर स्त्री शक्तीचा - नवरात्रौत्सव २०२२' कार्यक्रमात आज होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला कोपरगाव शहरासह तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंडळाच्या अध्यक्षा मा.सौ. पुष्पाताई काळे यांनी यावेळी उपस्थित राहून महिलांचा उत्साह वाढवला.
मिमिक्री आर्टिस्ट संदीपजी जाधव व सुधीरजी कोयटे यांच्या उत्कृष्ट सुत्रसंचालनाने कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवली. या स्पर्धेत छायाताई फरताळे यांनी प्रथम क्रमांकाने विजयी होऊन २१,००० रुपयांच्या, द्वितीय क्रमांक मिळवून शितलताई लोंढे यांनी १५,००० रुपयांच्या व तृतीय क्रमांक मिळवून अर्चनाताई आगलावे यांनी १०,००० रुपयांच्या पैठणीचा मान मिळवला. तसेच साक्षीताई जगदाळे, गुंजालीताई कडलग, अंजनताई कोपरे, रेणुकाताई हिवाळे, उज्वलाताई घोडेराव, कोमताई हिंगमीरे, शारदाताई जाधव व अनिताताई सोनवणे यांना उत्तेजनार्थ ३१०० रुपयांच्या पैठणीचा मान मिळाला.
यावेळी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या सदस्या व स्पर्धक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

