आ. दत्तात्रय भरणे यांनी केला झगडेवाडी सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदी तुकाराम जगन्नाथ मोरे व प्रकाश बळी झगडे यांची निवडी बद्दल सत्कार.
इंदापूर प्रतिनिधी: झगडेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदी तुकाराम जगन्नाथ मोरे व प्रकाश बळी झगडे यांची निवड करण्यात आली आहे.
झगडे व मोरे यांच्या संचालक पदी निवडीनंतर त्यांचा सत्कार माजी राज्यमंत्री व इंदापूर चे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नवनियुक्त संचालकांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, चेअरमन प्रल्हाद अभंग, व्हा चेअरमन राहुल झगडे, नामदेव झगडे, दादाराम झगडे, श्रीकांत मोरे,गोरख मोरे ,महादेव झगडे संतोष झगडे, राहुल झगडे, उत्तम झगडे, लक्ष्मण झगडे ,ज्योतीराम मोरे, उत्तम झगडे ,गणेश झगडे उपस्थीत होते.
यावेळी बोलताना नवनियुक्त संचालक तुकाराम मोरे व प्रकाश झगडे म्हणाले की झगडेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी आम्हाला संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली, यापुढे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊन सभासदांना न्याय देण्याची भूमिका घेऊ.

