इंदापूरचे दोन युवक निघाले सायकलवरून थायलंडला
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर सायकल क्लबचे करेवाडी येथील योगेश करे व गंगावळण येथील विशाल ठोंबरे हे दोन तरुण इंदापूर ते थायलंड हा जवळपास 4500 किलोमीटरचा प्रवास सायकल वरून करणार आहेत. या प्रवासादरम्यान पर्यावरण संवर्धन, मातीचे संवर्धन व आरोग्य विषयक जनजागृती करणार आहेत. एक ऑक्टोबर पासून त्यांचा सायकल प्रवास इंदापूर मधून सुरू झाला.रोज 80 ते 100 किमी प्रवास करणार आहेत. या दोन्ही तरुणांना इंदापूर सायकल क्लब च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. इंदापूर सायकल क्लबचे अध्यक्ष सुनील मोहिते यांनी सायकल क्लब च्या वतीने या दोन्ही तरुणां चा सत्कार केला व इंदापूरच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.
इंदापूर मधून पहिल्यांदाच देशाबाहेर सायकलवर जाणारे हे दोन तरुण आहेत. त्यांना क्लबच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे सांगितले. यावेळी इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व सायकल क्लबचे सदस्य स्वप्निल सावंत, दशरथ भोंग, रमेश शिंदे, असलम शेख, विनायक वाघमारे,अमित बधे, डॉ मारुती माने, ज्ञानदेव डोंगरे, उमेश राऊत इत्यादी उपस्थित होते

