shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षांना सामोरे जाताना अभ्यासाशिवाय पर्याय नाही-- प्रा.विकास मालकर

शौकतभाई शेख । श्रीरामपूर :-
विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना अभ्यासाशिवाय पर्याय नाही असे उद्गार नाशिकच्या पिरॅमिड अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा. विकास मालकर यांनी व्यक्त केले. तालुक्यातील बेलापूर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभाग, करिअर कट्टा विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करियर गायडन्स चर्चासत्रात ते बोलत होते.

पुढे ते असेही म्हणाले की, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, उत्तम करिअर, चांगली नोकरी, पदवी व पदव्युत्तर चांगला अभ्यासक्रम , मानसन्मान प्रतिष्ठा ,पारितोषिके, बक्षीसे इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्राप्त होते.त्यामुळे सरळ सेवा परीक्षांमधून विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करावी.सिलेक्शन कमिशन , महाराष्ट्र लोकसेवा आयोग, रेल्वे रिक्रुटमेंट बँकिंग आदि स्पर्धा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात .उपलब्ध पदांची संख्या ही कधी शंभरात तर कधी हजारात असते. त्यात आपल्याला टिकायचे असेल तर अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. 

भारतात सर्वात जास्त लोक भारतीय रेल्वेमध्ये काम करतात. त्या खालोखाल नंबर लागतो तो भारतीय सैन्य दलाचा. सरकारी नोकरीमध्ये ठराविक कालावधीनंतर तसेच विभागीय परीक्षा द्वारे बढतीच्या संधी देखील प्राप्त होतात. सरकारी नोकरीत जायचे असेल तर स्पर्धा परीक्षांना सामोरे जावेच लागते .त्यांचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती आत्मसात करावी लागते. मानव्यविद्या शाखेतील सर्व विषयांचा अभ्यास करावा लागतो.दुस-या सत्रात न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य योगेश पुंड यांनी मोटिव्हेशनल स्पीच दिले. करियर करण्यासाठी नियोजन, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी असेल तरच यशाचे शिखर गाठता येते असे ते म्हणाले.खुल्या सत्रामधे विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने प्रश्न विचारले व मान्यवरांनी निराकरण केले.चर्चासत्राचे अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाबाबतीत सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे सांगितले.

बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त रविंद्र खटोड,शेखर डावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्र संपन्न झाले.पायल म्हस्के (FYBA)हिने सुत्रसंचालन केले, अध्यक्षीय सूचना विजया फलके (TYBCOM) हिने मांडली तर अध्यक्षीय अनुमोदन पुजा सोनवणे (FYBA) हिने दिले.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करुन दिला.  मनिषा मुसमाडे (TYBCOM) हिने आभार मानले.चर्चासत्राचे संयोजन स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. विठ्ठल सदाफुले,करीअर गायडन्सचे समन्वयक डॉ.अशोक माने ,अंतर्गत गुणवत्ता विभागाचे समन्वयक डॉ. बाबासाहेब पवार,प्रा विकास नालकर यांनी केले.या चर्चासत्रासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
close