shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"अशोक" प्रतिदिन एक लाख लिटर इथेनाॕल व अल्कोहोलनिर्मिती करणार ; माजी आ.भानुदास मुरकुटे

शौकतभाई शेख श्रीरामपूर:-
 अशोक कारखाना यंदाच्या गळित हंगामात प्रतिदिन एक लाख लिटर इथेनाॕल तसेच प्रतिदिन एक लाख लिटर अल्कोहोल उत्पादन करणार आहे.तसेच काही प्रमाणात थेट रसापासून प्रायमरी ज्युसापासून इथेनाॕल निर्मिती करणारआहे.त्याचप्रमाणे उत्पादन  खर्चात मोठी बचत होत असल्याने राॕ शुगरचे उत्पादनवरही भर देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले. 

       'अशोक' च्या सन २०२२-२३ च्या गळित हंगामाचा बाॕयलर अग्नि प्रदिपन समारंभ माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली तसेच राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी श्री.मुरकुटे बोलत होते. 

       श्री.मुरकुटे म्हणाले की, कारखाना सद्यस्थितीत प्रतिदिन चाळिस हजार लिटर इथेनाॕल व अल्कोहोल निर्मिती करीत आहे.आता या दोन्ही प्रकल्पांच्या उत्पादन क्षमतेत प्रतिदिन साठ हजार लिटरची वाढ होणार असल्याने यंदाच्या गळित हंगामात प्रतिदिन एक लाख लिटर इथेनाॕल व अल्कोहोल निर्मिती केली जाणार आहे. तालुक्यात काही अपप्रवृत्ती आहेत.या प्रवृत्ती चुकीचे व निराधार आरोप करुन दिशाभूल करतात. रावण दहन करुन जसे अपप्रवृतीचे दहन केले जाते. तसेच महिषासूरमर्दीनीने  राक्षसांचा वध करुन पृथ्वी राक्षसमुक्त केली यासाठी विजयदशमी साजरी केली जाते.

याप्रमाणेच  तालुक्यातील अपप्रवृत्तीचा बिमोड करारुन तालुका अपप्रवृत्तीमुक्त करावा असे आवाहन श्री.मुरकुटे यांनी केले. कारखान्याने बाहेरुन ऊस आणला म्हणून कार्यक्षेञातील ऊसाचे गळितास उशीर झाला, या आरोपात तथ्य नाही. कारखान्याने गेल्या हंगामात कार्यक्षेञाबाहेरुन ७८ हजार टन ऊसाचे गाळप केले तर २ लाख १८ हजार टन बाहेरच्या कारखान्यांना दिला. यावरुन विरोधकांची दिशाभूल लक्षात येईल. यंदाच्या गळित हंगामात केन्द्र शासनाने एक्सपोर्ट साखरेबाबत जे धोरण स्विकारले ते योग्यच आहे. राॕ शुगर निर्मितीमुळे उत्पादन खर्चात क्विंटलमागे सुमारे रु.२५० ते रू.३०० ची बचत होते हे ध्यानात घेवून यंदाच्या हंगामात राॕ शुगर उत्पादनावर भर दिला जाणार असल्याचे श्री.मुरकुटे यांनी स्पष्ट केले.
        यावेेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्य अविनाश आपटे तसेच काशिनाथ गोराणे बाबा यांची भाषणे झाली. प्रारंभी संचालक ज्ञानेश्वर काळे व त्यांची सुविद्य पत्नी सौ. सोनाली काळे तसेच डेप्यु. चिफ केमिस्ट जालिंदर दसपुते व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शीतल दसपुते यांचे हस्ते विधिवत पुजन करण्यात आले. कार्यकारी संचालक संतोष देवकर यांनी गळित हंगामाबाबत विवेचन केले. तर व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे यांनी आभार मानले. यावेळी हंगामी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात आॕर्डर्सचे वाटप करण्यात आले.
      कार्यक्रमास माजी चेअरमन कोंडीराम उंडे, रावसाहेब थोरात, ज्ञानदेव साळुंके, सुरेश गलांडे, सोपानराव राऊत, दिगंबर शिंदे,भाऊसाहेब कहांडळ, दत्तात्रय नाईक, बाबासाहेब काळे,लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, सौ.शितलताई गवारे, माजी सभापती प्रा.सौ.सुनीताताई गायकवाड, अशोक बँकेचे व्हा. चेअरमन अड.सुभाष चौधरी, शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे, कारेगाव भाग कंपनीचे माजी चेअरमन बाबासाहेब ढोकचौळे, अशोक मिल्कचे चेअरमन श्रीधर कोलते, भाऊ थोरात, अॕड डी.आर. पटारे,  सौ.शालिनीताई कोलते, टाकळीभान येथील शंकरराव पवार, सखाराम कांगुणे, भाऊसाहेब हळनोर, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक चव्हाण आदिंसह सभासद, कारखाना संचालक मंंडळाचे सर्व सदस्य, अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
close