२ ऑक्टोबर रोजी इंदापूर तहसील कार्यालय समोर माहिती अधिकाराच्या गैरवापराकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.
राष्ट्रसेवा दल महाराष्ट्र राज्याचे संघटक गफूरभाई सय्यद यांनी एक दिवशी लाक्षणिक उपोषणा संदर्भात दिले इंदापूर तहसीलदार यांना निवेदन पत्र.
इंदापूर प्रतिनिधी:गफूरभाई सय्यद संघटक महाराष्ट्र राज्य राष्ट्रसेवा दल यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त यांच्या नावे दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी माहिती अधिकाराच्या गैरवापराकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाबाबत चे निवेदन पत्र इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
सदर निवेदन पत्रात म्हटले आहे की, २ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रशासनाची चे पुढील गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण तहसील कार्यालयाच्या समोर इंदापूर येथे करणार आहे.१) माहितीचा अधिकाराचा वापर करून मिळवलेल्या माहितीचे पुढे काय होते?. २)मिळवलेल्या माहितीचा आधार घेऊन संबंधित अधिकारी अथवा विभागावर तक्रारी अर्ज दाखल करणारा व्यक्ती संबंधित तक्रार परत घेत असताना गैरसमजुतीतून व अनावधानाने असे शब्द प्रयोग करून ती तक्रार मागे घेतो त्यावेळी संबंधिताची भूमिका संशयास्पद वाटते. म्हणून अशा एकूणच प्रकरणांची नव्याने तपासणी होऊन संबंधितावर प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत.
३)वारंवार वेगवेगळ्या विभागात माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या व्यक्ती अथवा व्यक्तींची चौकशी होऊन माहिती अधिकार टाकण्यासंदर्भातील हेतू चुकीचा अथवा जाणीवपूर्वक त्रास देण्याचा हेतू आहे का याची सकल चौकशी व्हावी.
४)माहिती मागणाऱ्या व्यक्तीला मागितलेल्या माहिती संदर्भात ज्ञान आहे का तसेच मागवलेल्या माहितीशी अशा व्यक्ती अथवा व्यक्तींचा दुरानव्ये काही संबंध आहे का ?याची चौकशी होऊनच माहिती का पुरवली जाऊ नये? तरी या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल होण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही व्हावी या एकमेव उद्देशाने लाक्षणिक उपोषण करणार असून या संदर्भातील मागण्यांसाठी पुढील आंदोलनाची दिशा व स्वरूप निवेदनाद्वारे पुढील काळात कळविले जाईल अशा आशयाचे निवेदन पत्र राष्ट्रसेवा दल संघटक महाराष्ट्र राज्य गफूर भाई सय्यद यांनी इंदापूर चे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याकडे दिले आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हा धिकारी यांना पाठवलेले आल्याची माहिती गफूरभाई सय्यद यांनी दिली.

