श्री भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था सुरवड यांची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.
पाणीपुरवठा संस्थांवरील वाढीव वीज दरवाढ रद्दचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व हर्षवर्धन पाटील यांचे मानले आभार.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची श्री भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था सुरवड यांची ३६ वी वार्षिक सभा श्रीकृष्ण मंगल कार्यालय सुरवड या ठिकाणी पार पडली.
या सभेमध्ये जून २०२१ मध्ये पाणीपुरवठा संस्थांची वीज दर वाढ ही १. १६ पैसे प्रति युनिट वरून ३. ६९ पैसे प्रति युनिट झाली होती. संस्थेने ही दरवाढ रद्द करावी अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे केली होती . हर्षवर्धन पाटील यांनी ही दरवाढ रद्द करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली त्यानुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी ही दरवाढ तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे वीजदर आकारण्यात यावे असा निर्णय घेतला. त्यामुळे पाणीपुरवठा संस्थांवरील वीज दरवाढीचे संकट टळले. याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व हर्षवर्धन पाटील यांचे आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय घोगरे सर यांनी प्रास्ताविकामध्ये मानले.
तसेच कृषी संजीवनी २०१७ तील व्याज माफी मिळाली नाही ती ही लवकर मिळावी तसेच नवीन वीज दरानुसार बिले दुरुस्त करून मिळावी अशी ही मागणी यावेळ करण्यात आली.
या वार्षिक सभेचे अध्यक्ष कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॕ.शंकरराव मगर होते .
डॉ मगर यांनी संस्थेचे कामकाज पाहता आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले.
या सभेसाठी संस्थेचे चेअरमन केशव सुर्वे , सोपान तोरसकर, दादासाहेब घोगरे, रामदास कोरटकर, चांगदेव घोगरे, ज्ञानदेव मगर, सूर्यकांत फडतरे, बाळासाहेब घोगरे, शरद कोरटकर, हेमंत कांबळे, दशरथ सुर्वे, लक्ष्मण कोरटकर, तात्यासाहेब खोपकर , साहेबराव घोगरे. तुकाराम तोरसकर , सतीश माने व स्वनील घोगरे
आदी उपस्थित होते. तर आभार प्रदर्शन सूर्यकांत फडतरे यांनी मानले.

