shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वन्यजीव सप्ताह निमित्त अलिबाग वनविभागाच्या वनरक्षकांसाठी साप आणि अन्य वन्यजिवांचे बचावकार्य करण्याची कार्यशाळा संपन्न..!



राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी:-
WWA (वाइल्डलाइफ वॉरियर्स ऑफ अलिबाग) आणि OWLS (ऑर्गनायझेशन फॉर वाइल्डलाइफ स्टडीज) ह्या संस्था गेली अनेक वर्षे वन्यजीव बचाव आणि जनजागृती साठी कार्यरत आहेत.

WWA (वाइल्डलाइफ वॉरियर्स ऑफ अलिबाग) आणि OWLS (ऑर्गनायझेशन फॉर वाइल्डलाइफ स्टडीज) ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून  अलिबाग वनविभागाच्या वनरक्षकांसाठी साप आणि अन्य वन्यजिवांचे बचावकार्य कसे करावे ह्याची कार्यशाळा तीनविरा येथील वनविभागाच्या केंद्रामध्ये  डॉ. प्रसाद दाभोळकर ह्यांच्याद्वारे घेण्यात आली.

अलिबाग आणि भोवतालचा परिसर हा नैसर्गिक जैवविविधतेने नटलेला आहे, त्यामुळे साप आणि अन्य वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर इथे आढळून येतो. अश्या वेळी मनुष्य - वन्यप्राणी संघर्ष हा स्वाभाविक आहे, अश्या प्रसंगी वनविभागाची भूमिका फार महत्वाची असते, म्हणूनच वनरक्षकांना बचावकार्याचे योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक असते जेणे करुन वन्यजीवांचे संरक्षण होईल तसेच सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होईल असे डॉ. प्रसाद दाभोळकर ह्यांनी सांगितले.
सदर कार्यशाळेसाठी अलिबाग वनविभाग, WWA चे अदिती सगर, ओमकार कामतेकर, पारस घरत, सुजित लाड, रुपेश गुरव, समीर पालकर आणि OWLS च्या सभासदांनी विशेष मेहनत घेतली.
close