shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हेमंत मुसरीफ यांच्या छान छान कविता..!

देहदान  ..

समारंभ झाला थोर 
एकसष्टी  निमित्तानं
आले स्नेही कितीकं
करती अभिष्टचिंतन

मित्र  सच्चा  भेटला
दाविला  मार्ग  छान 
घडे एक  पुण्य कर्म 
नोंदवले मी  देहदान

दानधर्म अल्प केला
आयुष्यां मज कडून
सत्कर्म झाले नक्की
मरणोत्तरी  ये  घडून 

पुष्पगुच्छ भेटी नको
बोललो  हात जोडून 
नाव आपले नोंदवून 
घ्यावे रे  पुण्यजोडून

२)

सृष्टी दिन ..

सुंदर या जगी काही
दु:खीकष्टी दृष्टीहीन
उघड्या डोळा पाही
आपणही  हीन दीन

पुण्यकर्म सहज घडे
करू  चला  नेत्रदान
मरणोत्तर पाहू  शके
नवी दृष्टी सृष्टी छान

त्रासमुळी नसे काही 
हवी  इच्छा मनातून
भावनेला   आवरावे
सत्कर्म घडेलं हातून 

कलेवरां  मोह फुका
गेल्यावरती जगातून 
शुष्ककाष्ठ जणूंअसे
अंती जाणार जळून

दृष्टीरूपे राहे जीवंत
जग  घ्यायचे  पाहून 
येती  पुढे  बाकीचेही
आपले पाऊल पाहून 



३)
अपंगत्व ..

असे असावे शरीर
नाही कुणा हातात
मडक्यासम  वेगळे
तन असे  जगतात

मिळते कधी कुणां
व्यंगत्व जन्म जात
काही कमी  जास्त
जसेअसे प्रांक्तनात

येते  कधी अपंगत्व
घडता घातअपघात
भले चांगले चालले
अचानक  वज्रघात

व्यंगत्व नको मनात
निदान असे हातात
माणूस आहो जाण
जागृती  हो  जनात

व्यंगात्मक कुणावर
टिका  करू  नकात
बदलू शकते वेळही
जाणीव हो  लक्षात

अवयव दान करुनि
पुण्य घ्यावे  पदरात
मरणोत्तर रे अमरत्व
रहायचे  सुख भरात


४)
ज्योतिर्गमय ..

दिवाळीसण प्रकाशाचा
तमसो  मा  ज्योतिर्गमय
पणती लावूनि  अंतरात
आता नको तिमीरा गय

सार्थ व्हावी भाऊबीज
महिलांना मिळो अभय
नारी हीलक्ष्मी खरोखर
तीचं लावी जीवना लय

नियम  पालन  धन्वंतरी 
सर्वांनी  रहावे  निरामय
कोरोना नवा  नरकासूर
नको त्याची ती  हयगय

तिजोरी बंद नको लक्ष्मी
लागो घरोघरी तिचे पाय
वसुबारस  सण आगळा
पाळावी  रे भाकड  गाय

पाडवा करे  नव वर्षारंभ
कोरोनालढा ठाम निश्चय
आपणासह दुजेही सुखी
पुण्य  जोडू  करू  संचय

दिवाळी ही जरा निराळी
जाणूआशय होवू निर्भय
बदलत राहे  सदा  समय
भगवंत ना  कधी  निर्दय

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996..
www.kavyakusum.com

close