शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन) :-
शिर्डी आघाडी सरकारची शिर्डी शहराची विकासाचे कामी दाखवलेल्या उदासीनतेमुळे शिर्डी शहराच्या मा नगराध्यक्षा व उत्तर नगर जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख मा सौ अनिताताई जगताप यांनी आपल्या शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री ना एकनाथ जी शिंदे यांच्या हस्ते भगवा ध्वज घेऊन आपल्या गटात प्रवेश केला तसेच छत्रपती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना नेते विजयराव जगताप मा उपनगराध्यक्ष शिर्डी यांनी आपल्या संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
मीनाक्षीताई डुबल, भारतीताई कोराटे, प्रियाताई शेळके, रेखाताई कदम, शशिकांत रहाणे, निवृत्ती गोंदकर,लक्ष्मण गुंजाळ, भास्कर जगताप, संजय मुदलियार, प्रसाद जगताप, अजित जगताप, नितीन जगताप, सचिन जगताप, कृष्णा लंके, रामदास शिंदे, सुदाम भोसले, शाकीर शेख, रफिक सय्यद ,राजू व्यवहारे, राजेंद्र दाभाडे, भिमाजी गणकवार, कैलास देवकर, चंदू भाऊ सोनवणे, आनंद शेळके आदी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश केला.

