कोपर येथे सावित्रीच्या लेकीना सायकलचे वाटप
|राजेश बाष्टे अलिबाग | प्रतिनिधी |:-
'सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे' या उपक्रमांतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून गरीब, गरजू आणि हुशार मुलींना शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते कोपर येथे सायकलींचे वाटप करण्यात आले.
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आज पर्यन्त अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यात जवळपास १४६२३ हून अधिक सायकलींचे वाटप करण्यात आलेले आहे. लवकरचं १ लाख सायकल वाटपाचा आमचा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत. शेकापची कायमच गोर, गरीब जनतेशी नाळ जोडली गेलेली आहे. ग्रामपंचायत चरी पाठोपाठ कोपर येथे मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध असलेला आमचा पक्ष आहे, सायकल वाटप मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही करतो असे उद्गार आमदार जयंत पाटील यांनी कार्यक्रम प्रसंगी काढले.
यावेळी व्यासपीठावर आमदार भाई जयंत पाटील यांच्या समवेत शेकापचे माजी जिल्हा परिषद प्रतोद, जिल्हा परिषद सदस्य अँड. आस्वाद पाटील, शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, माजी पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, माजी प. स. सदस्य संदीप घरत, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष विक्रांत वार्डे, चरी – कोपरच्या सरपंच निलिमा पाटील, माजी सरपंच जयराम ठाकुर, माजी सरपंच विजय ठाकुर, वसंत ठाकुर, जगदिश ठाकुर, चिंतामणी ठाकुर, प्रकाश ठाकुर, जनार्दन ठाकुर, रामचंद्र ठाकुर, तुकाराम ठाकुर, सुधाकर थळे आणि इतर कार्यकर्ते विद्यार्थी आणि पालक आदि मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना आमदार जयंत पाटील यांनी संगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी जीवनभर लढणारा नेता, जगातील सर्वात मोठा शेतकऱ्यांचा चरी कोपरचा ऐतिहासिक संप व त्यानंतर शासनाला कायदा करण्यास भाग पाडणारे नेते आमचे आजोबा नारायण नागू पाटील यांच्यापासून आजपर्यंत इथले शेतकरी, ग्रामस्थ आमच्या सोबत कायम एकनिष्ठ आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गावांचा विकास करणे हे आमचे कर्तव्य समजतो, कोपर गावासाठी लवकरचं आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे या करिता १ कोटी १७ लाख रूपयांचा निधी मंजूर केलेला असून या कामाचा शुभारंभ काही दिवसांत करण्यात येणार आहे. तसेच पाणीपुरवठा योजणेकरिता ४३ लाख रुपये मंजूर केलेले आहेत याचे काम सुद्धा लवकर सुरू होईल असे आमदार जयंत पाटील यांनी संगितले.


