shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिंचोलीमाळी येथे नवनिर्वाचित चेअरमन सह संचालकांचा सत्कार!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

भाजपाचे जेष्ठ नेते सुनिलआबा गलांडे पाटील यांनी मंगळवारी केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील श्रीकृष्ण मंदिरात चिंचोलीमाळी येथील सेवा सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हॉइस चेअरमन, सह सर्व संचालकांचा सत्कार सोहळा  आयोजित केला होता.भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली  व प्रमुख पाहुणे केज बाजार समितीचे माजी सभापती अंकुशराव इंगळे, सेवानिवृत्त सहाय्यक परिवहन अधिकारी दत्तात्रय देशमुख, दिलीप गुळभीले,  यांच्या हस्ते यां सर्वांचा यावेळी सत्कार  करण्यात आला.


सत्कार सोहळ्यात नंदकिशोर मुंदडा, अंकुशराव इंगळे, सुनिलआबा गलांडेपाटील ,चंद्रकांत भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी नवनिर्वाचित चेअरमन अरुण काळे, व्हॉईस चेअरमन आबासाहेब केदार, संचालक,भारत गालफाडे, मलिकार्जुन गलांडे, बालाजी राऊत, दिलीप बर्डे, रफीक शेख, राजेभाऊ नखाते, महादेव गिते,जयप्रकाश नखाते, शिवाजीआबा गायकवाड, बळीरामजी नखाते, दगडु दळवे, दिलीप गायकवाड,सुनिल राऊत,चंद्रकांत भुजबळ, सेवानिवृत्त सहाय्यक वाहन निरीक्षक दत्तात्रय देशमुख, हभप सुनिल महाराज गालफाडे, अशोक बर्डे, डॉ. महेंद्र राऊत, अॅड. भुजंगदादा गलांडे, अॅड. बाळासाहेब गलांडे, अॅड. श्रीकृष्ण गलांडे, रविंद्र गलांडे, पत्रकार अनिल गलांडे, नारायणआबा राऊत, नारायण नखाते, ग्रामपंचायत सदस्य अभिजित राऊत, विजय माने, धिरज वनवे, किशोर काळे,भिमराव केदार , सुनील नखाते, रामराजे राऊत,  अमीन शेख, ज्ञानोबा माऊली पवार, अशोक पवार, विष्णू पवार, श्रीधर वनवे, शंकरराव काळे, देवीदास काळे, मुख्याध्यापक सुधाकर ढाकणे, वैजनाथ राऊत, गोकुळ शिंदे, सदाशिव काळे, चंद्रकांत शिंदे, नागोराव काळे, महादेव पवार, मुरलीधर नखाते, पांडुरंग गलांडे, आबा महाराज मेहरकर, सिताराम नखाते, तुकाराम राऊत, इमाम पठाण यांचेसह ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचल पत्रकार मधुकर सिरसट यांनी केले.



सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही सत्कार

यावेळी नुकतेच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले वसंत काळे, अंकुश नींगुळे, आणि देविदास नखाते यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते,शाल, श्रीफळ, आणि पुषगुच्छ देऊन करण्यात आला.

close