प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
तालुक्यातील सांगवी येथील रहिवाशी माजी उपसरपंच ज्ञानोबा राघोबा केदार वय (८५) यांचे मंगळवार रोजी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्यावर मंगळवार रोजी केदारवस्ती येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.सांगवी सेवा सहकारी सोसायटीचे ते ४० वर्ष चेअरमन होते.दहा वर्षे त्यांनी सांगवी सारणिच्या उपसरपंच पदावर काम केले होते.
त्यांच्या पश्चात तीन मुले ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रा . रामचंद्र केदार, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार,दत्ता केदार यांचे वडील होते.


