shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साहेब मला न्याय पाहिजे ; जमिनीच्या वादातुन आंबेडकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु ...


विविध संघटनांचा जाहिर पाठिंबा


प्रतिनिधी : सचिन गांधी

 नगर :११/  अहमदनगर तालुक्यातील देहरे या गावातील .शेतकरी कचरू आंबेडकर यांना जमिनीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून न्याय मिळण्यासाठी त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने मंगळवार  दि .११ ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे .

भुमिअभिलेख अधिकारी, पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रा.प. सदस्य यांच्याशी संगणमत करुन जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी देत शेत जमिन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाज कंटकांवर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक काद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्वरीत अटक करण्यात यावी असे  उपोषणकर्ते कचरु आंबेडकर यांनी सांगितले .

न्याय मिळण्यासाठी या उपोषणास विविध सामाजिक संस्था , संघटना , राजकिय व्यक्तींनी पाठिंबा दिला आहे . नामदेवराव चांदणे अध्यक्ष, सत्यशोधक आण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठाण ,रशिदभाई शेख सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी , विजय चव्हाण जिल्हाध्यक्ष गोरसेना अ.नगर , मा. राम चव्हाण जिल्हाध्यक्ष आदिवासी पारधी विकास परिषद तसेच भगवान जगताप , बाळू काळे , संभाजी पाखरे, अमोल शिंदे , सिताराम सकट , याकुब वडागळे , गणेश घोलप , बबलु खोसला यांनी पाठींबा दर्शविला आहे .
close