लेखी आश्वासनाने म्हस्के यांचे उपोषण सुटले
शिवा म्हस्के यांचे चौथे आमरण उपोषण यशस्वी ..
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ११ / नगर तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद शाळा, ग्रामसेवक बदली, पाणी वापरण्याची पाइपलाइन मध्ये भ्रष्टाचार, शाळा गुणवत्ता, शाळा इमारत धोकादायक जबाबदारी निश्चित करणे , नगर तालुक्यातील १०५ गावात सि सि टिव्हि कॅमेरे ,थम मशीन हजरी पत्रक बसवणे अशा विविध मागण्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या संबंधित विभागाने मान्य केल्यामुळे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी लेखी पत्राद्वारे सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के यांनी उपोषण सोडले .
म्हस्के यांचे समाज हिताच्या विविध मागण्यांसाठी चौथे आमरण उपोषण होते ते यशस्वी झाले .
या मागण्या मान्य झाल्याने दहिगाव ग्रामस्थांमधे आनंदाचे वातावरण पसरले आहे. सामाजिक कार्यकर्त्याचे लोकशाही मार्गाने दोन दिवस आमरण उपोषण चालू होते. आज उपोषण घटनास्थळी प्रशासनाच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे साहेब, गटविकास अधिकारी थोरात ,विस्तार अधिकारी खाडे,उप अभियंता राऊत साहेब बनकर साहेब उपस्थित होते.
मा.राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दादासाहेब दरेकर,मा.सभापती अभिलाषा घिंगे,नाना गायकवाड, हातवळणचे सरपंच बाळासाहेब मेटे, सबिल सय्यद, संदिप जावळे, संजय वायकर, सचिन गांधी , विनायक गुरसाळी, निरज चांगटे ,सद्दाम शेख,तुकाराम वाघ, सुर्यकांत म्हस्के भाऊसाहेब रोहकले, भाऊसाहेब आन्हाड महाराज,अँड. अमोल थोरवे, आदी मान्यवर उपोषण सोडतेवेळी उपस्थित होते.
दोन दिवसा पासून जिल्हा परिषद समोर अमरण उपोषण चालु ह़ोते.जिल्हा परिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय आला . उपोषणाच्या ठिकाणी लाईट व्यवस्था नव्हती वैद्यकीय सेवा नव्हती . जिल्हा परिषद प्रशासनाचा बेजबाबदार पणा स्पष्टपणे दिसून आला . आज अनेक पाठिंब्यामुळे उपोषण यशस्वी झाले .
शिवा म्हस्के
सामाजिक कार्यकर्ते

