वडापुरी येथे रब्बी हंगाम पूर्व प्रशिक्षण राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत ज्वारी प्रकल्प बियाणे वितरण
इंदापूर प्रतिनिधी: आज मौजे वडापुरी येथे रब्बी हंगाम पूर्व प्रशिक्षण राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत ज्वारी प्रकल्प बियाणे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकरी बचत गट अध्यक्ष ,सचिव ,सदस्य व वडापुरी येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी श्री भाऊसाहेब रुपनवर तालुका कृषी अधिकारी इंदापूर यांनी रब्बी ज्वारी विषयी शेतकऱ्यांना पूर्व मशागत सुधारित वाण, पेरणी अंतर व एकात्मिक अन्नधान्य व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .तसेच कृषी योजनांचे मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक शिंगटे व ए एल जावळे कृषी सहाय्यक यांनी केले.
चालू वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष असल्यामुळे वडापुरी गावामध्ये रब्बी ज्वारीचे प्रकल्प मंडळ कृषी अधिकारी सूर्यवंशी जी पी व तालुका कृषी अधिकारी बी एस रूपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आहेत.हे वर्ष 2022-23 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष घोषित केलेले आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ज्वारी पिक प्रात्यक्षिक कार्यकमात सहभाग घेऊन कार्यक्रम राबविण्यात यावा असे अवाहान कृषि अधिकारी सुर्यवंशी यांनी केले.

