प्रतिनिधी : आसावरी वायकर
सोलापूर : ३ / राष्ट्रपिता महात्मा गांधी,लाल बहादूर शास्त्री तसेच साने गुरुजी यांचे आदर्श आपल्यासमोर आहेत. त्यांचे विचार विसरू नका असे सांगत मुलांना संस्कारासाठी श्यामची आई यासारखी पुस्तके वाचू द्या,असे विचार जेष्ठ साहित्यिका डॉ.श्रुती वडगबाळकर यांनी व्यक्त केले.ते अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गुणवंत साहित्यसेवा पुरस्कार व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण करतेवेळी सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ बालसाहित्यिक अवधूत म्हमाणे हे होते.
प्रारंभी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अरुणकुमार धुमाळ व रामचंद्र धर्मसाले यांनी प्रार्थनेचे गायन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त साहित्यिक व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यामध्येडॉ. सुमन नवलकर यांना निर्मला मठपती स्मृती बालसाहित्य सेवा पुरस्कार, डॉ. युवराज माने यांनाप्रकाशभाई मोहाडीकर स्मृती बालसाहित्य सेवा पुरस्कार.( पुरस्काराचे स्वरूप – २५००/- रु सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व ग्रंथ असे होते.
गुणवंत शिक्षक पुरस्कार :
सावित्रा कस्तुरे यांना सोनाबाई भीमराव म्हमाणे स्मृती गुणवंत शिक्षिका पुरस्कार.
लक्ष्मी वाडीकर यांना मंदाकिनी अशोक खानापुरे स्मृती गुणवंत शिक्षिका पुरस्कार,
गीता चिकमनी यांना यमुनाबाई बाबुराव राजमाने स्मृती गुणवंत शिक्षिका पुरस्कार,
अभिनंदन विभूते यांना निरंजनकुमार उमाठे स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार,
राजूभाई मुलाणी यांना दीनबंधू कमळे गुरुजी स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार
अलका मलगोंडे यांना पार्वती कल्लप्पा म्हमाणे स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार
सूर्यकांत वाघमोडे यांना गुंडप्पा झाडबुके स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार
पर्यवेक्षक सुरेश राठोड यांना डॉ. नागेश सोनटक्के स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार.
सारंग पाटील यांना विठ्ठलराव नाशीककर स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार.
यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह ,शाल व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.याच कार्यक्रमांमध्ये साने गुरुजी कथा मालिकेतील पदाधिकारी सेवानिवृत्त मुख्याध्यापक रंगसिद्ध दसाडे, प्राचार्या उज्ज्वला साळुंके, प्रा.गणेश लिंगरे, रामचंद्र धर्मसाले यांची विविध क्षेत्रात निवड व पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ साहित्यिक अवधूत म्हमाणे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सानेगुरुजी कथामालेचे कार्यवाह अशोक खानापुरे यांनी करून दिला.सन्मानपत्राचे वाचन रामचंद्र धर्मसाले व डॉ .देविदास गुरव यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्षा आरती काळे यांनी केले तर कोषाध्यक्ष अशोक म्हमाणे यांनी आभार मानले.

