सगळ्या समाजाला एक संघ आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार मंडळाचे अभिनंदन आभार मानणे हे आपले कर्तव्य - प्रदीप गारटकर.
श्री विठ्ठल मित्र मंडळ वडापुरीचे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले कौतुक.
इंदापूर प्रतिनिधी:सगळ्या समाजाला एक संघ आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार मंडळ आहे ते खऱ्या अर्थाने मंडळाचे या ठिकाणी अभिनंदन सुरुवातीला करणे आभार मानन हे तुमचे आमचे कर्तव्य आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वडापुरी येथे श्री विठ्ठल मित्र मंडळ वडापुरी आयोजीत भव्य खुल्या नृत्य स्पर्धेचे दिनांक १ ऑक्टोबर पासून आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचा दुसरा दिवस म्हणजे २ ऑक्टोबर या दिवशी श्री विठ्ठल मित्र मंडळाच्या देवीची आरती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारडकर यांच्या हस्ते संपन्न झाले व त्यानंतर नृत्य स्पर्धेचे दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी प्रदीप गारटकर यांचा सत्कार संपन्न झाला. त्यानंतर त्यांनी उपस्थित जनसमुदायास संबोधित करताना प्रतिपादन केले.
यावेळी सोलापूर जिल्हा युवती अध्यक्ष व गावातील इतर व मित्र मंडळ पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रदीप गारटकर म्हणाले की, विठ्ठल मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद यासाठी देतो की रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य प्रत्येक कुटुंब हे अतिशय ताण-तणावाखाली जगत असतो. आणि ते ताण तणाव जगत असताना आपल्या असलेल्या धर्मामध्ये संस्कृतीमध्ये जे परंपरेने आलेले सण उत्सव आहेत. या सर्व उत्सवाच्या माध्यमातून निमित्ताने सगळ्यांना एकत्र करणं. एकमेकांना बोलत करण. त्याचबरोबर एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं. विचारांचं आदान प्रदान करणं. अशा सगळ्या गोष्टींसाठी या उत्सवांचं आपल्यात एक महत्त्व आहे. आणि हे उत्सव हे मंडळ आणि पदाधिकारी पुढे होऊन साजरी करत असतात. त्यामध्ये समाजाला एकत्र आणण्याचा या ठिकाणी संधी मिळत असते. त्यामध्ये हिंदू मुस्लिम असो, काही जातीत पातीचा विषय असो हे सगळे विषय बदलून या ठिकाणी सगळ्या समाजाला एक संघ आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार मंडळ आहे ते खऱ्या अर्थाने मंडळाचे या ठिकाणी अभिनंदन सुरुवातीला करणे आभार मानून हे तुमचे आमचे कर्तव्य आहे. तुम्हा सर्व उपस्थित यांच्या वतीने या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो. यामध्ये रोजच्या रोज वेगवेगळे कार्यक्रम ठेवले आहेत. येथे काही कलाकार त्यांचे कला सादर करणार आहेत. नृत्य कला गायन कला असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या कला आहेत. या ठिकाणी सगळ्या कलांचे प्रदर्शन. मुलगा शाळेत शिकला की मोठा होतो असे नाही .तो खेळामध्येही मोठा झाला आहे .कोणी नृत्य मध्ये अभिनयामुळे अभ्यासामुळे माहित आहेत. तर प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये काही ना काही तरी गुण आहेत. त्या गुणांना वाव मिळवून देण्यासाठी म्हणून आज वडापुरी सारख्या एका ग्रामीण असलेल्या भागांमध्ये गावांमध्ये श्री विठ्ठल मित्र मंडळ हे पुढाकार घेत आपल्या गावातल्या मुला मुलींना या ठिकाणी उत्तम पद्धतीचा सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण करून देत. की ज्या व्यासपीठावरती एक स्वतःची कला या ठिकाणी दाखवण्याची संधी मिळवून देईल. त्यामुळे त्यांचे आभार मानल तितका थोड आहे.
नवरात्र उत्सव दसरा उत्सव उद्याची दिवाळी असो अन्य येणारे सण असो प्रत्येक जाती धर्माला या ठिकाणी जे सण परंपरेने आलेले आहेत त्या सगळ्या सणांचा उपयोग काहीतरी चांगलं निर्माण करण्याकरता केले पाहिजे. श्री विठ्ठल मित्र मंडळाच्या वतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. येथील सर्वजण अतिशय चांगल्या विचाराने कला करतात. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. राजकारणामुळे फार गल्लत झालेली आहे. मी योगायोगाने राजकारणात आलेला कार्यकर्ता आहे. एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि राजकीय पोकळी निर्माण झाली तर समाजानं तिथं नेऊन बसवलं. त्यामुळे मी राजकारणात आलो तरी राजकारणात असून सुद्धा धाडसाने सांगतो. राजकारणाच्या वेळेला राजकारण निवडणुकीच्या वेळेला राजकारण करूया. परंतु इतर वेळेला समाजकारणाला अत्यंत महत्त्व दिलं गेलं पाहिजे. जर समाज जिवंत राहिला. तुम्ही किती मोठे व्हा. खूप मोठे पैसे कमवा. तुम्ही नाव कमावलं .पण असलेल्या समाज गरीब गरीब होत गेला आणि तो एक दिवस मरून पडला तर तुमचे मोठेपण ऐश्वर्या बघायला समाज तरी जिवंत पाहिजे .त्यामुळे या समाज जिवंत ठेवायचे असेल स्वाभिमानाने उभे करायचे असेल तर या ठिकाणी राजकारणातील सगळ्या वाईट गोष्टी घडतात या राजकारणातून माणूस माणसात राहत नाही हे माणुसकीपण सोडून ते राजकारण थोडं बाजूला ठेवून अशा उत्सवातून कार्यातून आपल्या गावांमध्ये उत्सव होऊ द्या.

