shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंगोलीत २३ वर्षीय तरुणांचा गुप्तांग कापलेल्या नग्नावस्थेत आढळला मृतदेह..!

मृतदेहाचे गुप्तांग कापलेले व शरीरावरील जखमा पाहून पोलीसही चक्रावले..!


हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख) 

दि.२,हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील कवठा रोड परीसरातील स्मशानभूमीत नग्नावस्थेत आज दि.२ आँक्टोबर रोजी सकाळी एका २३ वर्षीय तरुणाचा कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. 




वसमत कवठा मार्गावर आसलेल्या स्मशानभूमीत आज सकाळी स असलम स सरफराज (२३ रा बुखारी तकीया)  या तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला.मृतदेहाचे गुप्तांग कापलेले असून शरीरावर जखमा दिसून येत होत्या.ही माहीती शहर पोलीसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम,दिलीप पोले,शेख नय्यर यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते.पाहणी केली आधार कार्ड सापडल्याने ओळख पटली. शहर पोलीसांनी घटनास्थळाची पूर्ण पाहणी  करून तपास सुरू आहे.या घटनेमुळे वसमत शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.हिंगोली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अनेकदा क्रूर हत्या सारखे धक्कादायक प्रकार व घटना हिंगोली जिल्ह्यात घडल्या आहेत. या घटनेला आळा  बसत नसून दिवसेंदिवस त्यात वाढत होत चालली आहे.आरोपीच्या मुस्क्या आवळणे त्याचबरोबर गुन्हेगारीला आळा घालण्याचे हिंगोली पोलिसांसमोर आव्हानच बनले आहे.मागील महिना हा दरोडे,चोऱ्या या घटनांनी गाजला आहे.आज वसमत शहरात घडलेली घटना ही प्रेम प्रकरणांतून घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून,तशाप्रकारे नागरिकांमधून दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळते आहे.अध्या या प्रकरणी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.पोलिसाच्या तपासानंतरच या घटनेमागचे गूढ उकलणार आहे.

close