शिवरामपुरी पतसंस्थेच्या विस्थारीत ईमारतीचे युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या हस्ते उद्घाटन.
मान्यवरांनी पतसंस्थेच्या कुशल कारभाराचा गौरव..
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
शिवरामपूरी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने मागील २० वर्षाच्या कार्यकाळात केलेली प्रगती ईतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केज विधानसभा मतदार संघाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी विडा येथे शिवरामपुरी पतसंस्थेच्या विस्तारित जागेत स्थलांतर कार्यक्रमा प्रसंगी केले.
विडा येथे ह.भ.प.वै.रामकृष्ण महाराज वरपगावकर यांच्या शुभहस्ते व माजी जि.प.उपाध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे यांच्या मार्गदर्शनाने २००३ साली सुरू झालेली ग्रामीण भागातील पतसंस्था प्रगतीपथावर आसून पतसंस्थेच्या सध्या ९ शाखा कार्यरत आहेत.तर पतसंस्थेने तब्बल ४० कोटींकडे यशस्वी वाटचाल केली आहे.
दरम्यान पतसंस्थेच्या विडा येथिल मुख्य कार्यालयाचे विस्तारित जागेत स्थलांतर सोमवारी दु.१ वा करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे तर कार्यक्रमाचे उद्घघाटन केज मतदार संघाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.पतसंस्थेला आशिर्वाद देण्यासाठी ह.भ.प.महंत श्रीराम महाराज विडेकर (शिवरामपुरी मठ संस्थान विडा) व ह.भ.प.गणेश महाराज (रामकृष्ण गड,अंबळाचे बरड यांची उपस्थिती होती.
विड्यासारख्या ग्रामीण भागात कार्यरत आसलेल्या शिवरामपूरी पतसंस्थेने ४० कोटींकडे वाटचाल केल्याचा आम्हाला आनंद आसून ईतरही पतसंस्थेला शिवरामपुरी पतसंस्थेच्या यशस्वी कार्याची प्रेरणा घेण्याजोगी असल्याचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी सांगितले.प्रसंगी जि.प.सदस्य विजयकांत मुंडे,माजी पंचायत समितीचे सदस्य अशोक चाळक,पिराचीवाडीचे सरपंच बाळासाहेब कराड,उपसरपंच विनोदास यादव,लिंबाचीवाडीचे सरपंच राजेभाऊ हाराळे,कोरडेवाडीचे सरपंच बाबासाहेब कोरडे,घाटेवाडीचे माजी सरपंच अशोक गायकवाड,काशिदवाडीचे माजी सरपंच महादेव जाधवर,युवा नेते अतुल इंगळ्,उध्दव पटाईत,तुळशिराम नांदे,डी.एल.नागरगोजे,युवा नेते ॠषीकेश पटाईत,ग्रा.पं.सदस्य डाॅ.धनराज पवार,विडा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमण अंकुश कलाणे,कृष्णा बॅकेचे सिईओ वसुदेव मुंडे,शिवसेनेचे जिल्हा संघटक अभिमान पटाईत,येवता सेवा सहकारी सोसायटीचे किसन सोनवणे,उद्योजक रामलाल छाजेड,प्रभाकर वायबसे,रामकिसन वायबसे,डाॅ.उदय पवार,रामराव मुंडे,हरिदास मुंडे,ज्योतीराम आंधळे,संदिपान आंधळे,ग्रा.पं.सदस्य दत्ता गित्ते,लिंबराज ढेंगे,बारिकराव भोसले,बळीराम चाळक,अंकुश जोगदंड,बप्पा बर्दापूरकर,सुंदर जाधव पतसंस्थेचे चेअरमण बाबासाहेब मुळे,मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुनिता पवार,शाखाधिकारी राणू पवार सर,गायकावाड साहेब,रमेश चौरे,विष्णू केदार,घनश्याम मुंडे यांच्यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण कन्हेरे यांनी केले.


