shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांवात २८ वर्षीय तरुण शेतकर्‍यांची कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या ..!

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)

दि.३,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील लिंबाळा तांडा येथील २३ वर्षीय तरुण शेतकरी सचिन राठोड यांनी कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली असुन सेनगांव पोलीसात आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद झाली आहे.



लिंबाळा तांडा येथील शेतकरी सचिन राठोड हे आपल्या वडीलासोबत राहतात त्यांच्या वडीलाच्या नावे ४ एकर जमिन असुन त्यांनी शेती कामासाठी स्टेट बँक आँफ इंडीया शाखा सेनगांव मधुन १ लाख २० हजार रुपये तर चार वर्षांपूर्वी महिंद्रा होम फायनान्स शाखा सेनगांव मधुन घर बांधकाम करण्यासाठी १ लाख २० हजार व परभणी मध्यवर्ती सहकारी बँक शाखा येलदरी मधुन १२ हजार रुपये तर खाजगी ७० हजार रुपये असे एकुण ३ लाख ५२ हजार रुपये कर्ज वडील व मयत मुलगा सचिनने अंदाजे एक वर्ष परतफेड केली होती.व उर्वरीत हप्ते बँकेत भरणे बाकी होते यावर्षी शेतात अतिवृष्टीमुळे नापीकी झाल्यामुळे बँकेचे हप्ते कसे भरावे या विवचंनेतुन सचिन राठोड यांनी दि.२५ सप्टेंबर रोजी शेतातील पिके फवारणीचे औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती.दि.३ आँक्टोंबर सोमवार रोजी मयताचे वडील बळीराम सखाराम राठोड यांच्या फिर्यादीवरून सेनगांव पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पो.नि.रणजीत भोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जाधव हे करीत आहेत.मयत सचिन राठोड यास दोन मुले असुन एक मुलगा ४ वर्ष तर एक मुलगा दिड वर्षाचा असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील शिंदे सरकारने या अल्पभूधारक शेतकर्‍याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सुज्ञ नागरीकातुन केली जात आहे.

close