प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
मागच्या पाच दिवसा पूर्वी केज ठाणे हद्दीत केज ते मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव फाट्या जवळ पिक-अपला कार आडवी लावून दरोडा टाकण्यात आला होता. परंतु पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा टाकणारी टोळी अवघ्या चार दिवसांत जेरबंद केली. त्यातील आरोपींना चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन दिवसात अथक परिश्रम करून वाटमारीचा तपास लावला. या वाटमारीत लखन जिजाराम साळवे रा. राशिन ता. कर्जत जि. अहमदनगर हा त्यांचा म्होरक्या असल्याचे निष्पन्न होताच या गुन्ह्यातील त्याचे साथीदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली तुकाराम कोल्हे (रा. जवळा ता. जामखेड जि. अहमदनगर), वैभव अजिनाथ हजारे (रा. जवळा ता. जामखेड जि. अहमदनगर), अविनाश परशुराम गायकवाड (रा. सेव्हहील आदर्श नगर , पुणे) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. त्यांचा आणखी एक साथीदार शुभम रमेश मोरे (रा. पापडी वस्ती हडपसर, पुणे) हा एका गुन्ह्यात हडपसर, पुणे यांच्या ताब्यात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडून केज पोलिसांनी हे आरोपी व घेतले. त्यांना न्यायालयाने दि. ६ ऑक्टोबर पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत असून त्यांच्या कडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.



