shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबतचे दिले निवेदन पत्र.

इंदापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबतचे दिले निवेदन पत्र.                               
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे २०२२ मध्ये परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी म्हणून इंदापूर तहसीलदार यांची नावे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी नायब तहसीलदार ठोंबरे यांच्याकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे  जिल्हाध्यक्ष किरण गोफणे ,जिल्हा उपाध्यक्ष सतिश शिंगाडे , तालुकाध्यक्ष तानाजी मारकड, तालुका संघटक तानाजी शिंगाडे, नवनाथ कोळेकर , युवक तालुकाध्यक्ष आकाश पवार, युवक सोशल मीडिया अध्यक्ष राम भाऊ ढिरे, युवक उपाध्यक्ष राजू जानकर,सोन्या जानकर, तालुका युवक संपर्क प्रमुख नवनाथ मेटकरी, तालुका संघटक अतुल शिंगाडे व आदी उपस्थित होते.                                     या निवेदनात म्हटले आहे की सन २०२२ मध्ये परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांची हाता तोंडाला आलेली पिके वाया गेलेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच लंपी सारख्या आजारामुळे जनावरांनाही नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे म्हणून विनंती की सण २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई चे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई चे तातडीने भरपाई देण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना योग्य सरसकट नुकसान भरपाई मिळेपर्यंत तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन पत्र देण्यात आले आहे. तसेच एका निवेदनाची प्रत इंदापूर पोलीस निरीक्षक यांच्या नावे इंदापूर पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.     
close