shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्ञी यांचे जीवन कार्य प्रेरणादायी- माजी आ.भानुदास मुरकुटे


शौकतभाई शेख ।  श्रीरामपूर :
महात्मा गांधी यांचे अहिंसा,शांती व बंधुत्व या तत्त्वाची आजच्या परिस्थितीत देशाला गरज आहे. महात्मा गांधी यांनी देशाला सत्याग्रह,चळवळ आणि जनआंदोलनाची मोठी देणगी दिलेली आहे. याप्रमाणेच दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देऊन जवान आणि शेतकरी यांचे महत्त्व अधोरेखित केले. या दोघांचेही जीवन देशासाठी समर्पित होते. त्यांचे स्मरण देशाच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

     लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त माजी आ.श्री.मुरकुटे यांच्या हस्ते महात्मा गांधी पुतळ्यास तसेच स्व.लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
 याप्रसंगी अशोक बँकेचे व्हा.चेअरमन ऍड.सुभाष चौधरी, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, शेतकरी सेवा केंद्राचे श्रीधर कोलते, कारेगांव भाग कंपनीचे संचालक संजय लबडे, मार्केट कमिटीचे माजी संचालक रमेश सोनवणे, खादी ग्रामोद्योग संघाचे व्हा. चेअरमन प्रविण फरगडे, अनिल कुलकर्णी,संदीप डावखर, विराज आंबेकर, विशाल धनवटे, प्रमोद करंडे, संकेत संचेती, नवाब शेख, शरीफ मेमन, वैभव सुरडकर, गणेश लोळगे, कैलास भागवत, सुहास भागवत, जयेश परमार, नागेश सोनवणे, संजय मोरगे आदी उपस्थित होते.
close