सध्याचं जग पूर्णपणे ऑनलाईन झाल आहे. शिक्षणापासून बँकिंग पर्यंत बऱ्याच गोष्टी ऑनलाइन केल्या जातात. परंतु या ऑनलाइन पद्धतीमध्ये अधून मधून छोट्या मोठ्या अडचणी किंवा संकटांचा सामना करावा लागतो. सद्या हेच संकट सोव्हा (SOVA) व्हायरसच्या रूपाने आता समोर आले आहे. हा व्हायरस मोबाईल बँकिंग ॲप्सना आपल लक्ष्य करत असल्याचं समोर आलं आहे. इंडियन कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) यांच्याकडून भारतीय बँक ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सोवा (SOVA) हा अतिशय घातक व्हायरस असून तो एकदा इंस्टॉल झाल्यावर त्याला अनइन्स्टॉल करणे अवघड आहे. हा व्हायरस मोबाईल मधे इंस्टॉल झाल्या नंतर त्याची क्षमता इतकी आहे की तो मोबाईल मधले युजर नेम आणि पासवर्ड हॅक करू शकतो. तसेच मोबाईल मधे दाखल झाल्या नंतर तो स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करू शकतो, त्या द्वारे वापरकर्ता करत असलेल्या सर्व घडामोडींची नोंद हॅकर्स ना मिळते. सोवा (SOVA) हा व्हायरस प्रामुख्याने मोबाईल बँकिंग ॲप्स ना टार्गेट असून त्या द्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक हल्ला होऊ शकतो, त्यामुळे अनेक मोठ्या बँकांनी आपल्या ग्राहकांना या व्हायरस पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. SOVA हा एक ट्रोजन (Trojan) असून त्याच्यामध्ये युजर्स च्या लॉग इन मध्ये लॉगिंग करून युजरनेम, पासवर्ड हार्वेस्ट करण्याची क्षमता आहे. याद्वारा कूकीज चोरी करणं, खोटे ओव्हरलेज तयार करणं ही कामं केली जातात. बॅंक अकाऊंट मध्ये नेट बॅंकिंग द्वारा लॉग ईन केलेल्या ग्राहकांचे क्रेडेन्शिअल्स देखील असुरक्षित होतात. SOVA या पूर्वी अमेरिका, रशिया, स्पेन ला लक्ष्य करत होता आता जुलै 2022 पासून तो भारतासह काही देशांमध्ये हल्ला करत आहेत. हा मालवेअर एकदा सिस्टम मध्ये घुसला की त्याला काढणं कठीण आहे. हा व्हायरस इतका घातक आहे की युजर ने हा अनइंस्टॉल करण्याचा प्रयत्न केला तर SOVA युजरला पुन्हा होम स्क्रिन वर येण्यामध्ये प्रतिबंध घालतो. यावेळी This app is secured असा मेसेजही फ्लॅश केला जातो.
सोवा (SOVA) पासून बचाव कसा करता येईल
सोवा (SOVA) हा एक ट्रोजन मालवेअर असून तो फसव्या पद्धतीने मोबाईल मधे प्रवेश करतो, म्हणजेच एखाद्या ओळखीच्या व नावाजलेल्या ॲप किंवा वेबसाईट यांच्या लोगोचा वापर करून त्याच्या आतून हा व्हायरस मोबाईल मधे प्रवेश करतो. या व्हायरस पासून बचाव करण्यासाठी शक्यतो माहितीच्या व खात्रीशीर स्त्रोतंकडूनच आवश्यक असलेले एप्लीकेशन डाऊनलोड करावे. तसेच केवळ माहीत असलेल्या वेबसाइट्स ना भेट द्यावी. स्मार्टफोनमध्ये नेहमी अँटीव्हायरस वापरा. खात्याशी संबंधित कोणत्याही संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ बँकेकडे तक्रार करा. कुठल्याही अनोळखी मेसेज, मेल किंवा लिंकला ओपन करू नये. या लिंक किंवा मेसेज हा एक प्रकारचा ट्रोजन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(ग्रंथपाल) श्रीरामपूर.
९७६५९७२१०८

