shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी गावातील पूल तत्काळ व्हावा ग्रामस्थांची मागणी.

वडापुरी गावातील पूल तत्काळ व्हावा ग्रामस्थांची मागणी.

गेली अनेक दिवसाची मागणी असूनही जबाबदारीने काम मार्गी लावण्यासाठी ठोस प्रयत्न दिसतच नाहीत.
  
मंजुरी नंतर  पुढे काम मार्गी लागतच नाही असे का?
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी गावातून जाणाऱ्या ओढ्याला सतत पावसाचे पाणी वाहत असते.तसेच सद्या मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे या ओढ्याला मोठ्या स्वरूपात पावसाचे पाणी आले असून या ठिकाणी टाकलेल्या सिमेंट पाईप मधून काही प्रमाणात पाणी जाते परंतु मोठ्या स्वरूपात पाणी असल्याने हे पाणी त्यावरून जात असते. अशी स्थिती गेल्या अनेक दिवसापासून असून या ओड्यावर पूलाची आवश्यकता असल्याचे गावातील नागरिकांच्या वतीने संबंधित प्रशासनास कळवले असून त्या संदर्भात हालचाली गेल्या अनेक दिवसापासून चालू आहेत. परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी कोणतीच हालचाल होत नसल्याची दिसत आहे. ओढा गावाच्या अगदी लगत असल्याने ओड्याच्या दोन्हीही बाजूला मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. त्यामुळे येण्या जाण्यासाठी या रस्त्याची व पुलाची अत्यंत गरज असते. या ओढ्यातून गावातील लहान लहान मुले शाळेला व इतर साहित्य खरेदीला जात असतात. परंतु अचानक आलेल्या पावसाने या ओड्यावर पाण्यामुळे जाण्या येण्यासाठी अडथळा निर्माण होतो. प्राथमिक शाळेत गावातील गरीब मजूर  यांची मुले शाळेला या ठिकाणाहून जात असतात. हे गरीब मजूर सकाळी कामासाठी बाहेर पडतात ते संध्याकाळी येत असतात. त्यांच्या पश्चात ही मुले शाळेला स्वतःहून जातात व येतात अशावेळी जर अशा मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पावसाने या मुलांना जाता येता येत नसेल तर याची जबाबदारी कोणाची? त्यासाठी वेळीच तजवीज करणे प्रशासनाची जबाबदारी असते की नाही? असा प्रश्न या गरीब मजूर पालकांकडून व्यक्त होत आहे.
विकास कामे  होतील विकास कामे झाली असतील .परंतु लहान मुलांचा जीव धोक्यात टाकणारे रस्ते, पूल होणे तत्काळ गरजेचे असते.आणि यासाठी खास प्रयत्न करून ते काम मार्गी लावणे हे संबंधित अधिकारी, पदाधिकारी व तेथील राजकीय नेते यांची असते की नाही असा सवाल या गावातील नागरिकांना पडला आहे. प्रयत्न चालू आहेत. कामे होतील, काही अडचणी आहेत, लवकरच काम मार्गी लागेतील, कामे मंजूर झाली आहेत. अशा प्रकारची उत्तरे संबंधित अधिकारी पदाधिकारी यांनी देणे अशा कामासाठी योग्य आहे का? अशा प्रकारची कामे तात्काळ होण्यासाठी यांनी प्रशासन स्तरावर ती तात्काळ हालचाली करणे यांची जबाबदारी नाही का? असाही सवाल या नागरिकांच्या वतीने व्यक्त होत आहे.
close